साहित्य-
१५० ग्राम मैदा
१५० ग्राम मावा/खवा
१२५ ग्राम तूप/लोणी
२०० ग्राम साखर
४ अंडी
१ चहाचा चमचा वॅनिला इसेन्स
१ चहाचा चमचा बेकिंग पावडर
पाव कप दूध
१चिमूट मीठ
कृती-
मावा पुरणयंत्रातून मो़कळा करुन घ्या.
मैदा,बेकिंग पावडर व मीठ एकत्र करुन घ्या आणि मोकळा केलेला मावा हलक्या हाताने त्यात मिक्स करा.
तूप/लोणी फेटून घ्या.
त्यात साखर घालून फेटा.
अंडी घालून बिट करा.
वॅनिला अर्क घाला ,२ मोठे चमचे दूध घाला.
मैदा व माव्याचे मिश्रण थोडे थोडे घाला व हलक्या हाताने फेटा.
मिश्रण घट्ट वाटले तर एखादा चमचा दूध घाला.
सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
अवन १८० अंश से. वर प्रि हिट करुन घ्या.
१८० अंश से. वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
(नेहमीसारखेच)केक झाला की नाही ते (त्याच्या)पोटात सुरी खुपसून पहा.
नंतर जाळीवर घालून थंड झाला की स्लाइस करा.
मावा केक खूप स्पाँजी होत नाही पण चवीला फार सुरेख लागतो.
मोठ्या केकपॅन ऐवजी पेपरकप्स मध्ये केकचे मिश्रण घालून मावा कपकेक्स सुध्दा करता येतील.
मिठाई आणि डेझर्टस्
केकावली-२. मावा केक
3 posts
• Page 1 of 1
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: केकावली-२. मावा केक
व्वा!! केकावलीतला पुढचा केक पाहून दिल खुष हो गया!
लहानपणी मावा केक आवडता केक होता - मग पुढे पेस्ट्रीज आल्या आणि मावा केक मागे पडला!
लहानपणी मावा केक आवडता केक होता - मग पुढे पेस्ट्रीज आल्या आणि मावा केक मागे पडला!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
Re: केकावली-२. मावा केक
वा!! मस्त सिरीज होतेय ही! चॉकलेट केक (थोडा कॉफिच्या चवीचा आणि किंचीत कडवट) करायला शिकवणार का?
- neha
- A Cook In The Making
- Posts: 19
- Joined: Tue May 13, 2014 10:01 pm
- Name: Neha Pune
3 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 0 guests