मिठाई आणि डेझर्टस्
ड्रायफ्रूट हलवा
2 posts
• Page 1 of 1
ड्रायफ्रूट हलवा
दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, रांगोळ्या, आकाशदिवे, नवे कपडे, फटाके, फराळ, मिठाई आणि दिवाळी अंक!
लाडू, चिवडा, चकली, कडबोळी, करंज्या, शेव, शंकरपाळे असे नेहमीचे फराळाचे पदार्थ तर असतातच. शिवाय हे एक खास कॅलरीबाँब डेझर्ट - खास दिवाळीसाठी!
साहित्य -
सुके अंजीर, बदाम, काजू - प्रत्येकी ५० ग्रॅम
खारीक पावडर ५० ग्रॅम
अक्रोड २५ ग्रॅम
खजूर २५ ग्रॅम
खवा २५० ग्रॅम
साजूक तूप - ४ ते ५ टेबलस्पून
दूध - १२५ मि.ली. (साधारण १ कप)
साखर - सपाट २ वाट्या
वेलदोडे किवा केशर वेलची सिरप - चवीसाठी
कृती -
काजू, बदाम, अक्रोड यांची वेगवेगळी भरड पावडर करून घ्या.
अंजीर व खजूर मिक्सरमधून फिरवून घ्या.
खवा मोकळा करून भाजून घ्या.
काजू, बदाम, अक्रोड यांच्या पावडरी प्रत्येकी चमचाभर तुपावर वेगवेगळ्या परतून घ्या.
अंजीर व खजूरही तुपावर परतून घ्या.
खवा आणि सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करून मंद आचेवर भाजा.
त्यात कपभर दूध घालून घोटत राहा.
मिश्रण थोडे घट्ट होऊ लागले की साखर घाला.
साखर विरघळेस्तोवर सतत घोटत राहा. हलवा लागू देऊ नका.
चमचाभर वेलदोडे पावडर किवा केशर वेलची सिरप घाला.
थोड्य वेळाने कडांनी हलव्याचे मिश्रण सुटू लागेल. तेव्हा आच बंद करा.
बदाम/पिस्त्याच्या कापांनी सजवा.
ड्रायफ्रूट हलवा तयार आहे.
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: ड्रायफ्रूट हलवा
वा!!!!! दिवाळीनिमित्त हे खासच!! आहे खराच कॅलरीबाँब!
पण मजा येईल खायला! स्वादिष्ट आणि पौष्टीक!
पण मजा येईल खायला! स्वादिष्ट आणि पौष्टीक!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 3 guests