
साहित्य-
टोमॅटो प्युरी १ वाटी किवा मोठे २ चांगले लालबुंद टोमॅटो,
मिरपूड, धनेजिरे पूड, ओवा - प्रत्येकी १ लहान चमचा,
तिखट व मीठ - स्वादानुसार
कणिक, तेल
कृती-
टोमॅटो पाण्यात घालून उकळणे, ते शिजत आले की चाळणीवर घालणे आणि जरा कोमट झाले की साले काढून उरलेला गर कुस्करणे व नंतर मिक्सर मधून फिरवून घेणे.
किवा- तयार प्युरी घेणे. त्यात तिखट, धनेजिरे पूड, मिरपूड, ओवा, तिखट, मीठ घालणे.चमचाभर तेल घालणे. त्यात मावेल एवढी कणिक घालून घट्टसर भिजवणे.१५-२० मिनिटे झाकून ठेवणे.
तेल तापत ठेवणे.
पुर्या लाटून मध्यम आचेवर तळणे.
हिरव्या चटणीबरोबर खाणे.
चटणी- २-३ मिरच्या चिरुन, कोथिंबिर,२ लसूणपाकळ्या, एका पेराएवढं आलं, मीठ चवीनुसार, १/२ चमचा साखर हे सगळे एकत्र करुन मिक्सर मधून फिरवणे, थोडे पाणी घालणे.