प्रेमदिनानिमित्त चला एक सोपी डिझर्ट पाककृती करुया
साहित्यः
कुकिंग चॉकलेट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे)
फ्रेश क्रीम (आवडीनुसार प्रमाण घ्यावे)
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
Confetti सजावटीकरता
ब्ल्युबेरीज (आवडीनुसार प्रमाण घ्यावे किंवा आवडीनुसार कुठल्याही बेरीज घेऊ शकता)
पाककृती:
चॉकलेटला थोडे बारीक चॉप करुन घ्या.
मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये तुकडे केलेले चॉकलेट घालून मिडियम पॉवर वर २०-३० सेकंद गरम करुन घ्या (हलके गरम झाले असताना बाहेर काढून मिक्स करा म्हणजे ते वितळायला लागेल).
गरज वाटल्यास आणखीन १० सेकंद गरम करुन घ्या.
चॉकलेट २ मिनिटे गार होऊ द्या म्हणजे ते चांगले पसरेल.
आता २ चमचे वितळलेले चॉकलेट सिलिकॉन मफिन कपमध्ये घालून कप सगळीकढून फिरवून घ्या,म्हणजे चॉकलेट सारखे लागेल.
असे सगळे कप्स तयार करुन घ्यावे व फ्रिजमध्ये ३० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.
एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा.
त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते)
आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे.
पुन्हा २-३ मिनिटे क्रीम सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे.
सेट झालेले चॉकलेट कप्स हलक्या हाताने सोडवून घ्यावे.
व्हिप्ड क्रीम एका पायपींग बॅगमध्ये घालून घ्यावे व चॉकलेट कप्समध्ये पाईप करावे.
त्यावर ब्ल्युबेरीज लावून Confetti ने सजावट करावी.
वरून थोडी पिठीसाखर भरभूरून घ्यावी.
हे डिझर्ट गारच सर्व्ह करावे.
लगेच सर्व्ह करणार नसलात तर बेरी चॉकलेट कप्स तयार करून फ्रिजमध्ये ठेवावे.
सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा !!
मिठाई आणि डेझर्टस्
प्रेमदिनानिमित्त व्हेरी बेरी चॉकलेट कप्स
3 posts
• Page 1 of 1
- Sanika
- Distinguished Chef
- Posts: 38
- Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
- Name: Sanika Nalawde
Re: प्रेमदिनानिमित्त व्हेरी बेरी चॉकलेट कप्स
काय divine प्रकार दिसतोय हा!!!! चॉकोलेट, ब्लू-बेरीज आणि अशी सजावट! बघुनच डोळ्याचे पारणे फिटतेय!!!
असे कोणी काही करून खायला दिले तर मी तरी आनंदाने सात जन्म बुक करायला तयार आहे!
असे कोणी काही करून खायला दिले तर मी तरी आनंदाने सात जन्म बुक करायला तयार आहे!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
Re: प्रेमदिनानिमित्त व्हेरी बेरी चॉकलेट कप्स
ही पाककृती इंग्लिश मध्येही लिहिणार का?
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
3 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 1 guest