२ वाट्या हुरडा , घरात असलेली भाजणी एक दीड वाटी,कोथिम्बिर ,मीठ, आवडीप्रमाणे ,चीलीफ्लेक्स एक चमचा ,लसुन मिरची ची भरड एक चमचा .तेल ,पाणी.
कृती:
सर्व प्रथम हुरडा ,कोथिम्बिर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे .(पाणी न घालता)ताटात काढून त्यात सगळे पदार्थ आणि भाजणी टाकून साधारण थालीपीठ साठी भिजवतो तसे भिजवून घ्यावे .अर्धातास झाकून ठेवून द्यावे .
नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून ,दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे .
दही आणि लोणच्याबरोबर गरमागरम खावे .