शाकाहारी पाककृती
प्रोटीन पॅक्ड तिखट आप्पे
2 posts
• Page 1 of 1
प्रोटीन पॅक्ड तिखट आप्पे
साहित्यः
३ वाट्या तांदूळ
१ वाटी उडदाची डाळ
३/४ वाटी मूग डाळ
१/२ वाटी तूरीची डाळ
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी जाड पोहे
४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा कांदा
कढीपत्ता
कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुवून, एकत्र ५-६ तास भिजवणे.
मिश्रण वाटण्याआधी पोहे भिजवून घेणे, मिरच्या बारीक चिरून घेणे.
मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, भिजवलेले पोहे व बारीक चिरलेल्या मिरच्या एकत्र करून वाटून घेणे.
वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून चांगले एकत्र करावे.
आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्यात थोडेसेच तेल घालावे व तयार मिश्रण डावाने घालून आप्पे सोनेरी रंगावर फ्राय करावे.
उलटवून दुसरी बाजू ही छान होऊन द्यावी, गरज वाटल्यास थोडे तेल घालावे.
तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
नोटः
ह्या मिश्रणाला फर्मेंट करायची गरज नाही. रात्री डाळ-तांदूळ भिजवले तर सकाळी नाश्त्याला बनवता येतात.
आवडत असल्यास सांबाराबरोबरही सर्व्ह करू शकता.
- Sanika
- Distinguished Chef
- Posts: 38
- Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
- Name: Sanika Nalawde
Re: प्रोटीन पॅक्ड तिखट आप्पे
खूप दिवसांनी लिहिले पण अगदी जोरदार - एकदम हेल्दी आणि चविष्ट दिसतात आहेत हे आप्पे. एकदा नेहमीचे सोडून हे करून बघायला आवडेल!
बाकी सविस्तर पाककृती, आणि दिमाखदार प्रेझेंडेशन नेहमीप्रमाणेच सुंदर!
बाकी सविस्तर पाककृती, आणि दिमाखदार प्रेझेंडेशन नेहमीप्रमाणेच सुंदर!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 14 guests