मिठाई आणि डेझर्टस्
केकावली-७.चेरी केक (प्रकार२)
2 posts
• Page 1 of 1
केकावली-७.चेरी केक (प्रकार२)
साहित्य-
१२५ ग्राम बटर,
१५० ग्राम साखर,
४ अंडी,
२५० ग्राम मैदा,
१ चिमूट मीठ,२.५ चमचे बेकिंग पावडर,
१/४ कप अॅपल किवा ऑरेंज ज्यूस,
१ चमचा लिंबाचा रस + १ चमचा लिंबाची सालं किसून,
५०० ग्राम बरणीतल्या /टिन मधल्या पाकातल्या लाल चेरी (ह्या चेरी आंबटगोड असतात म्हणून फ्लेवरला वॅनिला किवा तत्सम कोणताही इसेन्स न घालता लिंबाचा रस+ सालं घाला.लिंबाचा इसेन्स मिळाला तर ह्या बरोबर तोही १/२ चमचा घाला.)
कृती-
पाकातल्या चेरी चाळणीवर टाकून पाक निथळत ठेवा.
बटर चांगले फेटा,त्यात साखर मिसळा आणि परत फेटा. अंडी फोडून त्यात घाला व फेटा. लिंबाचा रस व किसलेली सालं घाला , लेमन इसेन्स असेल तर तो घाला.
मैदा + बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ एकत्र करा व ते वरील मिश्रणात थोडे,थोडे घाला व फेटा. मिश्रण एकजीव झाले की संत्रा किवा अॅपल ज्यूस घाला.
केक मोल्ड ला बटर लावा, त्यावर वरील मिश्रणातल्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त मिश्रण घाला. त्या मिश्रणावर चेरीज पसरुन घाला व उरलेले मिश्रण घालून चेरी झाकून टाका.
१७० अंश से ला प्रिहिटेड अवन मध्ये ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
पिठीसाखरेने सुशोभित करा.
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: केकावली-७.चेरी केक (प्रकार२) :-)
वॉव!!!! मस्त दिसतोय हाही चेरी केक. खास करून दुसरा फोटो तर फारच टेंप्टींग आहे!
खास ख्रिसमसच्या महिन्यातील ह्या केकच्या रेसिपीबद्द्ल मनापासून धन्यवाद!! अजून येऊ देत मस्त केक्स!!
खास ख्रिसमसच्या महिन्यातील ह्या केकच्या रेसिपीबद्द्ल मनापासून धन्यवाद!! अजून येऊ देत मस्त केक्स!!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 3 guests