मिठाई आणि डेझर्टस्
ऑरेंज चीली आईसक्रिम
2 posts
• Page 1 of 1
ऑरेंज चीली आईसक्रिम
साहित्यः
१. संत्री - ५ ते ६
२. लिक्वीड क्रिम - २५० मिलि
३. साखर - संत्र्यांच्या गोडिनुसार कमी / जास्त
४. टँग च अर्ध पाकिट (चित्रात आहे ते १०२ ग्रॅम चं आहे)
५. सुख्या लाल मिरच्या - २ किंवा चीली फ्लेक्स १/२ चमचा (कश्या तिखट आहे त्या प्रमाणात)
६. ऑरेंज कलर - १/२ चमचा
७. एका लिंबाचा रस (to cut the sharpness of chilli)
८. लिंबाची/संत्र्याची किसलेली साल - प्रत्येकि १ चमचा
९. सजावट आपल्या आवडिप्रमाणे
कॄती:
१. लिंबु आणि सत्र्यांच साल किसुन घ्या
२. सत्र्यांचा ज्युस काढुन घ्या. थोडा पल्पहि वेगळा ठेवा. सालं फेकुन देउ नका. सालींचा पांढरा भाग दिसेस्त ती चमच्याने स्कुप करुन घ्या आणि पाण्यात घालुन ठेवा जेणेकरुन सुकणार नाहित. फायनल स्टेप ला आपल्याला आईसक्रिम ह्यातच सेट करायचं आहे
३. लिक्वीड क्रिम मधे चवीप्रमाणे साखर घालुन व्हीप्ड करुन घ्या. मिक्सर मधे मिरच्या भरडसर वाटुन घ्या
४. आता क्रिम व्हिप्ड केलेल्या भांड्यात अनुक्रमे ऑरेंज ज्युस+पल्प, ऑरेंज+लेमन झेस्ट, लिंबाचा रस, टँगचं अर्ध पाकिट आणि ऑरेंज कलर घालुन हलक्या हाताने मिक्स करा. लहान मुलांचा पोर्शन वेगळा काढुन बाकिच्या मिश्रणात भरडसर वाटलेल्या मिरच्या घालुन मिक्स करा.
५. प्लॅस्टिक फॉईल लावुन फ्रिजर मधे सेट होण्यास ठेवा. एक ३-४ तासानी सेट झालं कि बाहेर काढुन परत एकदा चमच्याने मिक्स करुन सेट होण्यास ठेवा. हिच स्टेप अजुन २ वेळा रीपीट करा. असं केल्याने आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाहित.
६. चौथ्या वेळी पाण्यात घालुन ठेवलेले ऑरेंज कप्स पेपर टॉवेल किंवा टिश्युनी हलक्या हाताने पुसुन घ्या. सेट झालेलं आईसक्रिम ह्या रीकाम्या कप्स मधे भरुन कप्स परत सेट होण्यास ठेवा.
७. आईसक्रिम पुर्ण सेट झालं कि मस्त आंबट, गोड, तिखट ईनोव्हेटिव्ह ऑरेंज चीली आईसक्रिम तितक्याच ईनोव्हेटिव्हली पेश करा.
- DeepakD
- Distinguished Chef
- Posts: 8
- Joined: Thu Apr 10, 2014 12:48 pm
- Name: Deepak S. Dandekar
Re: ऑरेंज चीली आईसक्रिम
हे बघितल्यापासुनच कासावीस होतोय. कातिल फोटो, शिवाय संत्र्याच्या आंबट्गोड चवीत थोडीशी तिखट चव...आणि नजर लागेल इतकी सुरेख सजावाट आणि संत्र्यातच आईसक्रीम सर्व करण्याची कल्पकता. दिपक - ह्या अतिशय देखण्या आणि कल्पक पाककृतीसाठी अगदी साष्टांग दंडवत!
आणि माझ्या विनंतीला मान देऊन ही पाककृती इथे दिल्याबद्दल मनापासून आभार!
मला जमेल की नाही माहित पण ही नक्की करून बघणार. हे फोटोतले फळ संत्र्यापेक्षा किनू (Kinnow) वाटते आहे! असो!
आणि माझ्या विनंतीला मान देऊन ही पाककृती इथे दिल्याबद्दल मनापासून आभार!
मला जमेल की नाही माहित पण ही नक्की करून बघणार. हे फोटोतले फळ संत्र्यापेक्षा किनू (Kinnow) वाटते आहे! असो!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 26 guests