मिठाई आणि डेझर्टस्

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

Postby Sanika » Tue Jul 22, 2014 12:30 pm




साहित्यः

१ वाटी मैदा
१/२ वाटी पेक्षा जरा कमी बारीक रवा
अंब्याचा रस मैदा भिजवण्यापुरता लागेल तसा (ताजा आमरस ही वापरू शकता)
३/४ वाटी साखर (प्रमाण आमरसाच्या गोडीवर ठरवावे किंवा आपल्या आवडीनुसार)
१/२ वाटी पाणी
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून जायफळपूड
केशराचा काड्या
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून बदाम +पिस्ता+काजू तुकडे सजावटीसाठी
३टेस्पून तेल
पुर्‍या तळण्यासाठी तेल / तूप



पाकृ:

एका भांड्यात मैदा,रवा एकत्र करावे. त्यात ३ टेस्पून तेलाचे कडकडीत मोहन घालावे.
चांगले मिक्स करुन घ्यावे.
आमरस थोडा थोडा करून मैद्यात घालावा व नीट मिक्स करावे.
पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे व झाकून १५-२० मिनिटे ठेवावे.
१५-२० मिनिटांनंतर पीठ चांगले कुटून घ्यावे किंवा रवा-मैदा चांगला मळून घ्यावा.
मोठी जाडसर पोळी लाटून हव्या त्या आकाराच्या, लहान-मोठ्या पुर्‍या कातून घ्याव्यात.



दुसरीकडे तेल / तुप गरम करत ठेवावे.
वेगळ्या पातेल्यात साखर + पाणी+ लिंबाचा रस + वेलचीपूड + जायफळपूड+ केशर काड्या एकत्र करून गॅसवर ठेवावे.
साखरेचा दोन तारी पाक तयार करा.
तळणीत अलगद पुर्‍या सोडून मंद आचेवर तळून घ्याव्या.
पुर्‍या तळल्याबरोबर कोमट पाकात घालून मुरत ठेवा.
दुसर्‍या पुर्‍या तळून झाल्या की आधीच्या पाकातल्या पुर्‍या निथळून ताटात काढून ठेवा.



सर्व पुर्‍यांवर बदाम +पिस्ता+काजूचे तुकडे लावून सजवावे.
सणासुदीला पक्वान्न म्हणून बनवता येतात.
नेहमीच्या पुर्‍यांपेक्षा आमरस घालून केलेल्या पुर्‍या वेगळा प्रकार म्हणून छान लागतो.
पुर्‍या फार जाड लाटायच्या नाही नाहीतर त्या चिवट होतात.
अशाच प्रकारे कणकेच्या ही पाकातल्या पुर्‍या करता येतात.

Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

Postby manish » Tue Jul 22, 2014 1:41 pm

मी कधी खाल्ल्या नाहीत पण पहिला फोटो पाहूनच जो जीव कासावीस झालाय की बोलायची सोय नाही! केवढ्या टम्म फुगल्यात पुर्‍या..शिवाय तो रंग आणि पाकामुळे दिसणारे ग्लॉसी फिनीश अगदीच खास!!!!!!!! तोंडात लिटरभर लाळ जमा झालीये!!

गुरु माऊली - तुम्ही ग्रेट आहात! :)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

Postby Bosky » Fri Jul 25, 2014 3:01 pm

अप्रतिम सानिका ,खूपच टेम्प्टिंग ,भूक लागली बघूनच :)इत्क्या मस्स्त जमतील का माहित नाही पण नककी बनवणार :)
Bosky
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue Mar 25, 2014 6:44 pm
Name: BoskyTH


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest