"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.
साहित्यः
केक साठी:
मैदा - १/२ कप
साखर - १/२ कप
थोडेसे ब्राउन केलेले बटर - १/२ कप
अंडी - २
बेकिंग पावडर - १/२ टी.स्पुन
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
दुध - ३ चमचे
चॉकलेट टॉपिंग साठी -
कुकिंग ७०% डार्क चॉकलेट - २०० ग्रॅम
heavy cream - १/२ कप
जिलेटीन - १ चमचा
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
गरम पाणी - १/४ कप
साखर - १ चमचा
कृती:
१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन यावे.
२. एका बाउल मधे २ अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स, रम इसेन्स एकत्र फेटुन घ्यावे.
३. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.पाण्याला उकळी आल्यावर त्यावर ते अंड्याचे मिश्रण असलेले बाउल ठेवुन ३ मिनिटे परत फेटावे. (double boiler method वापरावी)
४. हे बाउल खालील गरम पाण्यास लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. नाहितर अंड्याचे scrambelled egg तयार होईल.
५. ३-४ मिनिटे चांगले फेटल्यावर त्यात थोडेसे brown केलेले पण खुप गरम नसलेले बटर ह्या अंड्याच्या मिश्रणामधे ओतुन निट मिक्स करावे.
६. निट मिक्स झाल्यावर त्यात चाळुन घेतलेला मैदा व बेकिंग पावडर टाकावे. हलक्या हाताने हे एकत्र करावे.
७. हे मिश्रण डोश्याच्या पिठाएवढे किंवा पॅनकेकेच्या पिठासारखे असले पाहिजे. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको.
८. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
९. एक केकचे भांडे घेउन त्याला बटर व मैदा लावुन घ्यावा व त्यावर बटर पेपर लावावा, त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही.
१०. आता ह्या भांड्यामधे वरच्या मिश्रणातील १ पळी मिश्रण ओतावे. ते पुर्ण भांड्यात निट पसरुन घ्यावे व ओव्ह्नमधे ठेवुन ५ मिनिटे बेक करावे.
११. ५ मिनिटात तो एक लेयर तयार झाला असेल. भांडे बाहेर काढुन त्यात अजुन १ पळी मिश्रण ओतावे व परत ओव्हनमधे ५ मिनिटे बेक करुन घ्यावे.
१२. अशा प्रकारे सर्व मिश्रण संपेपर्यंत करावे. शेवटचा लेअयर तयार झाल्यावर केक बाहेर काढुन थंड होवुन द्यावा.
१३. केक थंड होईपर्यंत चॉकलेटचे टॉपिंग बनवुन घेवु.
१४. एका भांड्यामधे क्रिम गरम करुन घ्यावे. त्यात चॉकलेटचे तुकडे, साखर, रम इसेन्स व व्हॅनिला इसेन्स टाकुन एकत्र करावे.
१५. वाटीमधे थोडे गरम पाणी घेउन त्यात जिलेटीन निट विरघळवुन घ्यावे. हे पाणी वरील चॉकलेटच्या मिश्रणामधे टाकुन निट मिक्स करावे.
१६. हे मिश्रण आता थंड झालेल्या केकवर ओतावे. सर्व बाजुने हे चॉकलेट लागले पाहिजे व वर चाचॉकलेटचा लेयर thick असला पाहिजे.
१७. आता केक १-२ तास फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावा.
१८. केक खायला तयार आहे.
मिठाई आणि डेझर्टस्
बाउमकुखन (ट्री केक)
2 posts
• Page 1 of 1
- mrunalini.salvi
- A Cook In The Making
- Posts: 4
- Joined: Thu Jul 17, 2014 11:22 pm
Re: बाउमकुखन (ट्री केक)
कातिल फोटो आणि पाककृती!! खास करून शेवटून दुसरा फोटो! पाहुनच तोंडाला पाणी सुटते! अर्थात इतके कॉम्प्लिकेटेड काही ह्या जन्मात जमेल असे वाटत नाही पण निदान बघून तरी खूष होऊ.
तसेही स्वाती ताईच्या केक सिरीज मधे केक शिकतोच आहे, जरा बेसिक केक जमायला लागले की ह्याचा विचार करेन....फार म्हणजे फारच टेंम्टींग आहे हा केक!
अशा अफलातून पाककृतीसाठी मनापासून धन्यवाद!
तसेही स्वाती ताईच्या केक सिरीज मधे केक शिकतोच आहे, जरा बेसिक केक जमायला लागले की ह्याचा विचार करेन....फार म्हणजे फारच टेंम्टींग आहे हा केक!
अशा अफलातून पाककृतीसाठी मनापासून धन्यवाद!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 1 guest