साहित्य:
२ वाट्या हुरडा , घरात असलेली भाजणी एक दीड वाटी,कोथिम्बिर ,मीठ, आवडीप्रमाणे ,चीलीफ्लेक्स एक चमचा ,लसुन मिरची ची भरड एक चमचा .तेल ,पाणी.
कृती:
सर्व प्रथम हुरडा ,कोथिम्बिर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे .(पाणी न घालता)ताटात काढून त्यात सगळे पदार्थ आणि भाजणी टाकून साधारण थालीपीठ साठी भिजवतो तसे भिजवून घ्यावे .अर्धातास झाकून ठेवून द्यावे .
नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून ,दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे .
दही आणि लोणच्याबरोबर गरमागरम खावे .
शाकाहारी पाककृती
हुरड्याचे थालीपीठ
2 posts
• Page 1 of 1
- archana
- A Cook In The Making
- Posts: 5
- Joined: Thu Apr 10, 2014 1:41 pm
- Name: archana
Re: हुरड्याचे थालीपीठ
अहाहा....मस्त ताज्या हुरड्याची थालीपीठ चविष्टच असणार. ह्या अनोख्या पाककृतीबद्दल मनापासून धन्यवाद!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 12 guests