साहित्यः
३ वाट्या तांदूळ
१ वाटी उडदाची डाळ
३/४ वाटी मूग डाळ
१/२ वाटी तूरीची डाळ
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी जाड पोहे
४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा कांदा
कढीपत्ता
कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुवून, एकत्र ५-६ तास भिजवणे.
मिश्रण वाटण्याआधी पोहे भिजवून घेणे, मिरच्या बारीक चिरून घेणे.
मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, भिजवलेले पोहे व बारीक चिरलेल्या मिरच्या एकत्र करून वाटून घेणे.
वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून चांगले एकत्र करावे.
आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्यात थोडेसेच तेल घालावे व तयार मिश्रण डावाने घालून आप्पे सोनेरी रंगावर फ्राय करावे.
उलटवून दुसरी बाजू ही छान होऊन द्यावी, गरज वाटल्यास थोडे तेल घालावे.

तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
नोटः
ह्या मिश्रणाला फर्मेंट करायची गरज नाही. रात्री डाळ-तांदूळ भिजवले तर सकाळी नाश्त्याला बनवता येतात.
आवडत असल्यास सांबाराबरोबरही सर्व्ह करू शकता.