साहित्यः
२ लीटर दूध
१ वाटी भिजवून, भरडसर वाटलेले तांदूळ
पाव वाटीपेक्षा जरा कमी खवा किसून घेणे
पाऊण वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) साखर
काजू, बदाम, पिस्ता काप
अर्धा टीस्पून वेलचीपूड
पाव टीस्पून जायफळपूड
केशर
कृती:
ही खीर मी मातीच्या भांड्यात बनवली आहे, मूळ पाककृतीत मातीच्या भांड्यात किंवा कुंडीत ही खीर बनवली जाते.
प्रथम गॅसवर भांडे ठेवून त्यात दूध उकळायला ठेवावे.
दुधाला उकळी आली की त्यात तांदळाचा रवा घालून सतत ढवळावे.
तांदूळ शिजला की त्यात साखर घालून ढवळावे.
खीर हळूहळू घट्ट होत आली की त्यात खवा मिक्स करून घ्यावा.
खवा घातल्यावर पाचएक मिनिटे शिजवावे.
त्यात सुकामेवा काप, वेलचीपूड, जायफळपूड व केशर मिक्स करावे.
ही खीर रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यामुळे या खिरीला अप्रतिम चव येते

चांदीचा वर्ख लावून गार सर्व्ह करावी ही शाही खीर.
टीप :
मातीच्या भांड्यात ही खीर बनवली तर चविष्ट लागते, पण मातीचे भांडे नसल्यास नेहमीच्या भांड्यात बनवली तरी चालेल.
या खिरीची पाककृती माझ्या बहिणीच्या मुस्लीम मैत्रिणीची आहे, त्यांच्याकडे मातीच्या कुंडीत ही खीर बनवली जाते. त्यात ते केवडा इसेन्सही वापरतात, चालत असेल तर तुम्ही जरूर वापरा.