साहित्यः
२०० ग्राम खवा किसून घेणे
१ वाटी पनीर किसून घेणे
५ टेस्पून मैदा
दीड टेस्पून दूध
२ वाट्या साखर
दीड वाट्या पाणी
वेलचीपूड व वेलचीदाणे
१/४ टीस्पून लिंबाचा रस
पिस्ते
चांदीचा वर्ख
पाकृ:
एका बाऊलमध्ये पनीर चांगले मऊसूत मळून घ्या.
किसलेला खवा ही चांगला मळून घ्या.
आता मळलेले पनीर, खवा, मैदा, दूध व १/२ चमचा साखर एकत्र करून मळून घेणे.
तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या.
प्रत्येक गोळ्यात एक पिस्ता व वेलचीदाणे भरून गोल वळून घ्या.
गोळे हलक्या हाताने वळा, एकही भेग / चीर पडता कामा नये.
कढईत तूप गरम करायला ठेवावे.
एकीकडे पॅनमध्ये साखर + पाणी एकत्र करून पाक करायला ठेवावा.
साखर पूर्णपणे विरघळली की त्यात १/४ चमचा लिंबाचा रस घालून घेणे.
तूप गरम झाले की तयार गोळे त्यात सोडा. गोळे हळू-हळू वर आले म्हणजे तूपाचे तापमान योग्य आहे असे समजावे.
झारा गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व्ह गोळे समान तळले जातील.
कालाजाम करायचे आहेत म्हणून थोडे जास्त तळावे लागतात.
एकतारी पाक तयार झाली की त्यात वेलचीपूड घालून एकत्र करावे.
तळलेले जाम आता कोमट पाकात घालून मुरू द्यावे.
कालाजाम मुरायला साधारण ५-६ तास लागतात.
तयार कालाजामावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.
कालाजाम तयार आहेत, बाप्पाला प्रसाद दाखवून सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा
