मिठाई आणि डेझर्टस्
केकावली- ९. अननस+ हनी अपसाइड डाउन केक
2 posts
• Page 1 of 1
केकावली- ९. अननस+ हनी अपसाइड डाउन केक
साहित्य-
१) पाक करुन घेण्यासाठी- ४ टेबल स्पून मध, ४ टेबल स्पून पाणी, टिन्ड अननसातला ३ टेबल स्पून पाक
२)बेससाठी- २५० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ५० ग्राम मध, १/२ चहाचा चमचा संत्र्याची किसलेली साले , २५० ग्राम मैदा, ५ अंडी, १५० ग्राम बदाम पावडर, पाव कप अननसाचा रस. तो नसेल तर ऑरेंज ज्यूस. ४ च. चमचे बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, टिनमधील अननसाच्या चकत्या.
कृती-
टिनमधील अननस चाळणीवर टाकून कोरडा करुन घ्या. पाकासाठीचे सर्व साहित्य म्हणजे मध, अननसाचा पाक आणि पाणी एकत्र करुन दाट करा व वेगळे ठेवून द्या.
प्रत्येक अंडे वेगळे फेटून घ्या आणि एका वाडग्यात जमा करा.
बटर भरपूर फेटा.साखर घालून फेटा, चिमूटभर मीठ आणि संत्र्याची किसलेली साले व ५० ग्राम मध घाला आणि फेटा.
ह्या मिश्रणात फेटलेली अंडी घाला आणि परत एकदा भरपूर फेटा.
मैदा+ बेकिंग पावडर+ बदाम पावडर एकत्र करा व ती वरील मिश्रणात घालून थोडे फेटून मिश्रण एकसारखे करा. आता यात अननसाचा किवा संत्र्याचा रस घाला.
टिनमधील अननस चकत्या केकमोल्डच्या तळाशी लावा, चकत्यांमधील भोकांत व उरलेल्या जागेत करुन ठेवलेला पाक घाला. ह्यावर केकचे मिश्रण पसरा.
१७० अंश से. वर अवन प्रिहिट करुन घ्या
१७० अंश से वर ६० ते ७० मिनिटे बेक करा.
केक झाला की नाही ते नेहमीप्रमाणेच विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा.
अवनचे दार उघडून केक अवन मध्ये तसाच पाच मिनिटे ठेवा, नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा.
आता केक जाळीवर उलटा करुन काढा. म्हणजेच खालचा भाग वर येईल आणि अननस चकत्या पृष्ठभागावर राहतील.
केक पूर्ण थंड झाला की कापा आणि कापताना एका तुकड्यावर अननसाची अर्धी चकती येईल असे पहा.
व्हिप्ड क्रिम घालून खा.
(आपण फारच हेवी खातो आहोत असे वाटले तर अपराधीपणाची भावना घालवण्यासाठी नंतर तासभर पळायला जा.)
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: केकावली- ९. अननस+ हनी अपसाइड डाउन केक
व्वा!! अननस आणि मध- भन्नाटच लागेल हा!
आणि हो, आठवडाभर पळावे लागेल, एका तासाने काय होतंय?
आणि हो, आठवडाभर पळावे लागेल, एका तासाने काय होतंय?
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 38 guests