मिठाई आणि डेझर्टस्

गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

Postby archana » Sat Feb 07, 2015 2:51 pm

साहित्य:

गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम.

कृती:

सर्व प्रथम गाजर धुवून ,त्याची साले काढून ,किसून घ्यावे .
एका कढाई मध्ये साजूक तूप घालून त्यात गाजराचा कीस टाकावा .
थोडा रंग बदले पर्यंत परतावा ,साधारण ५ मिनिटे .
नंतर त्यात condensed milk आणि साखर टाकून परतावे २ मी .परतावे मिश्रण थोडे पातळ होईल ते घट्ट होईपर्यंत परतावे आणि शिजू द्यावे ..
मिश्रण शिजत आले आहे आहे असे वाटले कि त्यात डेसिकेटेड कोकोनट टाकावे ,अजून २ मी .परतून
आच बंद करून मिश्रण गार होण्यासाठी एका ताटात काढावे .
मिश्रण चांगले गार झाले कि त्यात मिल्क पावडर टाकुन एकजीव करावे आणि त्याचे लाडू वळून हवे तसे सजवावे . वर बदामाचे काप लावावेत .

archana
A Cook In The Making
 
Posts: 5
Joined: Thu Apr 10, 2014 1:41 pm
Name: archana

Re: गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

Postby manish » Sun Feb 08, 2015 10:29 pm

मस्तच वाटतात आहे हे लाडू, सजावटही देखणी झाली आहे. करायलाही खूप अवघड नाही वाटत, करून बघितले पाहिजे! :-)
इतक्या सुरेख पाककृतीबद्द्ल मनापासून आभार! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests