मिठाई आणि डेझर्टस्
केकावली-६. चेरी केक (प्रकार१)
2 posts
• Page 1 of 1
केकावली-६. चेरी केक (प्रकार१)
साहित्य-
१२५ ग्राम बटर/तूप/लोणी,
१२५ ग्राम साखर
३ अंडी
लिंबाची किसलेली साल १ चहाचा चमचा + १ च. चमचा लिंबाचा रस
२०० ग्राम मैदा
१/४ कप दूध
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ
चेरी ५०० ते ७५० ग्राम - काचेच्या बरणीत अथवा टीनमध्ये शुगरसिरपमध्ये असलेल्या आंबटगोड चेरी मिळतात त्या घ्याव्या.
(जर्मनीत राहणार्यांनी sauerkirchen/schatten-morellen नावाने ज्या काचेच्या बरणीतील चेरी मिळतात त्या घ्याव्या.)
कृती-
बटर भरपूर फेटणे,
साखर घालून फेटणे,
अंडी घालून फेटणे. १ चिमूट मीठ, लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.
मैदा व बेकिंग पावडर एकत्र करणे.
मैदा थोडा थोडा घालत फेटणे.
शेवटी दूध घालून फेटणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.
चेरी चाळणीवर ओतणे व पाक काढून टाकणे.केकचे मिश्रण फेटायला घ्यायच्या आधीच चेरी चाळणीवर काढणे म्हणजे पाक पूर्णपणे निथळेल.
आता ह्या चेरीज केकच्या मिश्रणावर थोड्या थोड्या अंतरावर हलकेच बसवणे.
अवन प्री हिट करणे. १८० अंश से. वर ४० ते ४५ मिनिटे बेक करणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे.व्हिप्ड क्रिम घालून खाणे.
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: केकावली-६. चेरी केक (प्रकार१)
व्हिप्ड क्रिम बरोबर शेवटचा फोटो अतिशय आकर्षक दिसतोय! बेकींग करायला सुरुवत करतोच आता!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 35 guests