मिठाई आणि डेझर्टस्

मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

Postby DeepakD » Wed Jul 23, 2014 7:05 pm

नमस्कार मंडळि,

पॅना कोता (Panna cotta) हे एक ईटालीयन डेझर्ट आहे ज्याचा अर्थ आहे "cooked cream". फार कमी पदार्थ वापरुन एक झटपट आणि तितकचं क्लासी होणारं हे डेझर्ट आहे.

आंबा / स्ट्रॉबेरीचा सीझन अजुन असल्यामुळे हे पॅना कोता ह्या कॉम्बीनेशन मधे केलं आणि चव/रंगसंगतीच्या बाबतीत एकदम सरस ठरलं. पण एवढा खटाटोप टाळायचा असेल आणि धीर धरवत नसेल तर नुसत्या मँगो किंवा स्ट्रॉबेरीचहि छान लागतं.

चला तर मग ईटलीला न जाता ईटलीच्या डेझर्ट चा आस्वाद घेउया.



साहित्यः
१. तयार हापुस आंबे - २ (नसतील तर कॅन्ड मँगो प्युरेहि वापरु शकता)
२. १ बाउल स्ट्रॉबेरीज
३. लिक्वीड क्रिम - २०० मिली
४. दुध - १ कप
५. साखर (आंबा/स्ट्रॉबेरी च्या चवीनुसार कमी/जास्त)
६. अनफ्लेवर्ड जेलीची २ पाकिटं किंवा अगार-अगार (प्रत्येकि १० ग्रॅम चं एक ह्या प्रमाणे)
७. सजावट आपापल्या आवडिनुसार



कृती:

१. एका नॉनस्टिक पॅन मधे लिक्वीड क्रिम, दुध आणि साखर घालुन हलकं गरम करा. अगदि एक हलकिशी उकळि आली तरी चालेल. गॅस बंद करुन मिश्रण गार करत ठेवा (टिप नं १ बघा)



२. क्रिम गार होतेय तोपर्यंत आंब्या रस मिक्सर मधुन काढुन गाळण्याने गाळुन घ्या. मिक्सरचं भांड परत स्वच्छ धुवुन स्ट्रॉबेरीचा पल्प करुन घ्या म्हणजे पल्पचे रंग एकमेकात मिसळणार नाहित



३. अर्ध्या कप हलक्या गरम पाण्यात अनफ्लेवर्ड जेली/अगार-अगारचं १ पाकिट घालुन ठेवा (टिप नं २ बघा)

४. आता गार झालेल्या दुधमिश्रित क्रिमचे दोन भाग करा. एका भागात मँगो पल्प आणि दुसर्‍या भागात स्ट्रॉबेरी पल्प घालुन मिक्स करा. जेलीमिश्रित पाण्याचेहि २ भाग करा



५. जेलीमिश्रित पाणी ह्या वरील दोन भागात घालण्याआधी क्रिममिश्रित मँगो आणि स्ट्रॉबेरीचे आणखी १/१ भाग करा. आता मँगो आणि स्ट्रॉबेरीच्या एका भागात जेलीमिश्रित पाणी घालुन आवडत्या मोल्ड/कप्स/ग्लास मधे घालुन सेट होण्यास ठेवा. (टिप नं ३ बघा)



६. १५/२० मि. उरलेल्या मँगो आणि स्ट्रॉबेरीच्या भागात परत जेलीमिश्रित पाणी घालुन सेट झालेल्या पॅना कोता वर विरुद्ध भागाची लेयर सेट करा. म्हणजे तळाशी मँगो असेल तर त्यावरती स्ट्रॉबेरी किंवा हेच उलट्या क्रमाने. त्या मधल्या ग्लास सारखं डिझाईन करायचं झाल्यास दोन्हि पल्पमिश्रित क्रिम हळुवारपणे संततधारेने एकाच वेळेस ग्लास मधे ओतत जा.

७. फायनल लेर्यड केलेले ग्लास/कप्स परत एक १५-२० मि. डिप फ्रिजर मधे ठेवा आणि मग खाली फ्रिज मधे शीफ्ट करा (टिप नं ४ बघा)



८. एक ३-४ तासात सेट/चिल्ड झालं कि आवडेल तसं सजवुन क्लासीक पॅना कोता पेश करा.

टिपा:१. भारतात आपल्याकडे काहि वेळेला खुप जाड साखर येते. अश्या वेळेस ती पटकन विरघळण्यासाठि एक तर तीची पीठिसाखर करुन घाला किंवा गॅस वर ठेवण्याआधी डावेने ढवळुन घ्या म्हणजे क्रिम जास्त उकळलं जाणार नाहि.

२. बहुतेक वेळेला जेली भीजत घातल्यावर त्यात गुठळ्या होतात ज्या सहजगत्या मोडल्या / विरघळत (Dissolve) नाहित. त्या टाळण्याकरिता जेव्हा जेलीची पुड घालाल तेव्हा चमचा किंवा फोर्क ने सतत ढवळत रहा.

३. असं लेयरचं पॅना कोता करायचं झाल्यास, ग्लास मधे पहिली लेयर घातली कि ग्लास एक १५-२० मि. डिप फ्रिजर मधे ठेवा. झटकन सेट होतं. १५-२० मि. दुसरी जेलीमिश्रित लेयर घालुन सेट करा.

४. पहिली लेयर सेट झाल्यावर दुसरी लेयर घालताना मिश्रण ग्लास मधे एकदम ओतु नका. हळुवारपणे डावेने घालत जा. जरी डिप फ्रिजर मधे ठेवलं असलं तरी मिश्रण कधी कधी आतुन सेट होत नाहि (जरी वरुन दिसत असलं तरी). अश्या वेळेस एकदम ओतलं तर दोन्हि मिश्रण एकत्र होउन एक वेगळिच लेयर तयार होईल.

DeepakD
Distinguished Chef
 
Posts: 8
Joined: Thu Apr 10, 2014 12:48 pm
Name: Deepak S. Dandekar

Re: मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

Postby manish » Wed Jul 23, 2014 8:07 pm

दिलखेचक पदार्थ आणी तसेच प्रेझेंटेशन!! :-) बघुनच खावासा वाटतोय. शिवाय स्ट्रॉबेरी आणि आंबा - हे डेझर्ट नक्कीच अफलातून चवीचे असणार. पण सध्या इथे आंबेही संपलेत आणि स्ट्रॉबेरीही. सध्या नुसत्या दर्शनानेच भूक भागवावी लागणार :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 5 guests