मिठाई आणि डेझर्टस्

केकावली-१. स्पाँज केक

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

केकावली-१. स्पाँज केक

Postby swatidinesh » Sat Jul 12, 2014 7:31 pm

आपण अगदी बेसिक स्पाँजकेक पासून ह्या केकावलीची सुरुवात करु या.. एकदा हे जमले की पुढची सगळी शिखरे पार करता येतात. :)

साहित्य-
२५० ग्राम साखर,२५० ग्राम मैदा,२५० ग्राम लोणी किवा तूप,५ अंडी,१ लहानसे सफरचंद किवा १/४ कप दूध
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चहाचे चमचे वॅनिला अर्क+१ चमचा लिंबाचा रस ,१ चिमूट मीठ

कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे (बिट करणे),नंतर साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.मीठ,वॅनिला इसेन्स व लिंबाचा रस घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर एकत्र करणे व ते घालून फेटणे.
सफरचंद साल काढून किसणे व ते त्यात घालणे किवा पाव कप दूध घालणे व हलके फेटणे
केकच्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ४० ते ४५ मिनिटे बेक करणे. केक तयार झाला की नाही ते सुरी खूपसून पहाणे. सुरीला मिश्रण न चिकटता बाहेर आले तर केक झाला. नसेल तर अजून ५ मिनिटे अवन मध्ये ठेवणे.

केक झाला तरी अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या. नंतर स्लाइस कापा.



चॉकलेट स्पाँज केक बनवायचा असेल तर वॅनिला अर्काऐवजी ३ ते ४ टेबलस्पून डार्क कोको पावडर घेणे, बाकी कृती तशीच..

swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: केकावली-१. स्पाँज केक

Postby manish » Sat Jul 12, 2014 9:13 pm

व्वा! सुरुवात झक्कास झालीये एक्दम. तो पहिला स्पाँज केक दिसतोय एकदम हलका आणि स्पाँजी. हाताने फेटून इतका स्पाँजी होईल का?
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: केकावली-१. स्पाँज केक

Postby neha » Wed Jul 16, 2014 4:35 pm

मस्तच!!! पुढच्या केकची वाट पाहते!
neha
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue May 13, 2014 10:01 pm
Name: Neha Pune

Re: केकावली-१. स्पाँज केक

Postby Bosky » Wed Jul 23, 2014 6:55 pm

मस्तच!नक्की करणार्‍, खूप टेम्प्टींग दिसतय खरच.
Bosky
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue Mar 25, 2014 6:44 pm
Name: BoskyTH


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 36 guests