मिठाई आणि डेझर्टस्

केकावली- १०. रिकोटा लेमन केक

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

केकावली- १०. रिकोटा लेमन केक

Postby swatidinesh » Thu Oct 29, 2015 1:14 pm

चीजकेक म्हणजे कॅलरीबाँब! पण सणासुदीच्या उत्सवी दिवसात एखादेवेळी चालतात असे पदार्थ तर हा केक करण्यासाठी.

साहित्य-

५०० ग्राम रिकोटा चीज
१ मध्यम लिंबू (ऑरगॅनिक) लिंबू आदल्या दिवशी फ्रिजरमध्ये ठवून द्या कारण आपल्याला त्याची किसलेली साल हवी आहे. म्हणून ऑरगॅनिक लिंबू घ्यावे.
१५० ग्राम साखर
२ टीस्पून वॅनिला इसेन्स
३ अंडी
४ ते ५ चमचे कॉर्न स्टार्च + १/२ चमचा बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ

कृती-

फ्रिजरमध्ये ठेवलेल्या लिंबाची साल चांगली किसली जाते म्हणून ते डीप फ्रिज मध्ये ठेवा. केक करायच्या वेळी बाहेर काढून किसा व त्यातील अर्ध्या लिंबाचा रस काढा.
रिकोटा चीज एका बाउल मध्ये काढून घ्या व चमच्याने फेटा किवा हँडमिक्सीने ब्लेंड करा.
त्यात साखर मिसळा. वॅनिला अर्क, लिंबाची साल व अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि बिट करा.
एक एक अंडे त्यात फोडून घाला आणि फेटत रहा.
कॉर्नस्टार्च मध्ये चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर घालून मिक्स करा व हा स्टार्च चीजच्या मिश्रणात घालून बिट करा.
१७० अंशावर अवन प्रिहिट करा. २५ ते ३० मिनिटे केक बेक करा.
नंतर केकच्या पोटात सुरी किवा विणायची सुई खुपसून पहा. सुरीला मिश्रण न चिकटता बाहेर आली म्हणजे केक झाला. मिश्रण चिकटल्यास अजून एखाद दोन मिनिटे ठेवा. केक झाल्यावर लगेचच अवन बाहेर काढू नका. ५ मि. अवन मध्येच राहू द्या.
नंतर केक बाहेर काढून जाळीवर टाका.एअर फ्रायर वापरल्यास-
१६० अंशावर प्रिहिट करा.
२५ मिनिटे ए एफ मध्ये ठेवा. बेल झाली की एक मि. नंतर उघडा.
बाहेर काढून जाळीवर टाका.
(मी हा केक ए एफ मध्ये केला आहे.)swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: केकावली- १०. रिकोटा लेमन केक

Postby manish » Thu Oct 29, 2015 2:17 pm

मस्त टेंप्टींग दिसतोय हा केक - कॅलरी विसरून लगेच तोंडात टाकावा असा! :-)
manish
Master Chef
 
Posts: 183
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests