मिठाई आणि डेझर्टस्
चिकू खजूर फज/बर्फी
2 posts
• Page 1 of 1
चिकू खजूर फज/बर्फी
साहित्यः
१.५ वाटी चिकूचा गर,
१ वाटी ओलसर खजूर, खजूर ओलसर नसेल तर थोड्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून घेणे.
१.५ वाटी ते २ वाट्या साखर,
२५० ग्राम खवा,
१ मूठ काजू+ १ मूठ बदाम पावडर
कृती:
चिकू व खजूर यांचा पल्प करून घेणे. परतणे.
खवा मोकळा करून घेणे व वेगळा परतून घेणे.
चिकू व खजूराच्या मिश्रणात हा खवा मिक्स करून परतणे.
साखर घालून परतत रहाणे.
काजूपावडर व बदाम पावडर घालून परतणे.
मिश्रण घट्ट होत आले की थाळ्यात घालून पसरणे.
वड्या पाडणे.
काजूने /चांदीच्या वर्खाने जसे हवे तसे सजवणे.
हे फज असल्यामुळे वडी आतून ओलसर असते.
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: चिकू खजूर फज/बर्फी
मस्तच लागेल हे चिकू, खजूर आनि काजू/बदाम असल्यामुळे. फज थोडे ओलसरच चांगले लागते.
खव्यामुळे घट्ट नाही होणार का?
खव्यामुळे घट्ट नाही होणार का?
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 6 guests