साहित्य:
गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम.
कृती:
सर्व प्रथम गाजर धुवून ,त्याची साले काढून ,किसून घ्यावे .
एका कढाई मध्ये साजूक तूप घालून त्यात गाजराचा कीस टाकावा .
थोडा रंग बदले पर्यंत परतावा ,साधारण ५ मिनिटे .
नंतर त्यात condensed milk आणि साखर टाकून परतावे २ मी .परतावे मिश्रण थोडे पातळ होईल ते घट्ट होईपर्यंत परतावे आणि शिजू द्यावे ..
मिश्रण शिजत आले आहे आहे असे वाटले कि त्यात डेसिकेटेड कोकोनट टाकावे ,अजून २ मी .परतून
आच बंद करून मिश्रण गार होण्यासाठी एका ताटात काढावे .
मिश्रण चांगले गार झाले कि त्यात मिल्क पावडर टाकुन एकजीव करावे आणि त्याचे लाडू वळून हवे तसे सजवावे . वर बदामाचे काप लावावेत .
मिठाई आणि डेझर्टस्
गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)
2 posts
• Page 1 of 1
- archana
- A Cook In The Making
- Posts: 5
- Joined: Thu Apr 10, 2014 1:41 pm
- Name: archana
Re: गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)
मस्तच वाटतात आहे हे लाडू, सजावटही देखणी झाली आहे. करायलाही खूप अवघड नाही वाटत, करून बघितले पाहिजे!
इतक्या सुरेख पाककृतीबद्द्ल मनापासून आभार!
इतक्या सुरेख पाककृतीबद्द्ल मनापासून आभार!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 4 guests