मिठाई आणि डेझर्टस्

काजू अ‍ॅपल मिठाई

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

काजू अ‍ॅपल मिठाई

Postby Sanika » Tue Oct 21, 2014 9:36 pm



साहित्यः

१ वाटी काजू पावडर
१/२ वाटी साखर
१/४ वाटी पाणी
सजावटीसाठी लवंगा
खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे)



पाकृ:

नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करावा.
पाक तयार झाल्यावर त्यात काजू पावडर घालून मिश्रण एकत्र गोळा होईपर्यंत ढवळावे.
मिश्रण कडेने सुटू लागले व त्याचा गोळा होऊ लागला की ताटात काढून थोडे गार होऊ द्यावे.
सधारण कोमट झाले की त्याचे गोळे करुन घ्यावे. (इथे थंड वातावरण असल्यामुळे मिश्रण लगेच गार झाले त्यामुळे मला लगेच त्याचे गोळे करावे लागले)

छोटे गोळे तयार करुन वरुन हलके दाबून घ्यावे.
आता एक न वापरातला रंगाचा ब्रश स्वच्छ धुवून घ्यावा.
खायच्या रंगात बुडवून तयार गोळ्यावर त्याचे स्ट्रोक्स मारुन घ्यावे.
दाबलेल्या भागात लवंग देठ म्हणून रोवून ठेवावी. (तुम्ही देठासाठी पिस्त्याचे काप ही वापरू शकता)



काजू अ‍ॅपल तयार आहे. दिवाळीला मिठाई म्हणून तुम्ही खाऊ शकता , खिलवू शकता :)



तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!.
Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: काजू अ‍ॅपल मिठाई

Postby manish » Tue Oct 21, 2014 10:57 pm

हे...हे घरी बनू शकते??????????????????
देवाघरची दिसते आहे ही मिठाई, शिवाय काजूचीच आहे, त्यामुळे मस्तच लागेल!! दिसतेय पण किती सुरेख!!! दिवाळीची ह्यापेक्षा सुरेख सुरुवात अजून काय होऊ शकेल!!शतशः धन्यवाद सानिका!!! :-)

You made my Diwali!!!

colourful_diwali_240x320.gif
Happy Diwali
colourful_diwali_240x320.gif (247.88 KiB) Viewed 13385 times
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: काजू अ‍ॅपल मिठाई

Postby neha » Fri Oct 31, 2014 12:00 am

मस्तच आहे ही मिठाई :-)
neha
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue May 13, 2014 10:01 pm
Name: Neha Pune

Re: काजू अ‍ॅपल मिठाई

Postby Bosky » Thu Nov 06, 2014 11:07 pm

अहाहा......तोंडाला पाणी सुटलेय! :-)
Bosky
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue Mar 25, 2014 6:44 pm
Name: BoskyTH


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 3 guests