मिठाई आणि डेझर्टस्
क्रिम पफ Swans
2 posts
• Page 1 of 1
क्रिम पफ Swans
साहित्य Choux पेस्ट्रीसाठी:
१/२ वाटी मैदा
१/२ वाटी पाणी
१/४ वाटी अनसॉल्टेड बटर
२ अंडी
१/४ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून साखर (ऑपश्नल)
पाकृ:
एका नॉन-स्टीक पॅनमध्ये पाणी. मीठ व बटर एकत्र करुन गरम करायला ठेवावे.
पाण्याला उकळी आली की गॅस बंद करुन त्यात मैदा घालून मिश्रण एकत्र घोटून घ्यावे. (उकड काढतो त्याप्रमाणे)
मिश्रण एकत्र होऊन गोळा तयार झाला की दुसर्या भांड्यात ते काढावे व सतत चमच्याने हलवत रहावे.
त्यात साखर घालून एकत्र करावे.
मिश्रण जरा गार झाले, साधारण दहा मिनिटांनी त्यात एक अंडे फोडून घालावे व एकत्र करावे जोपर्यंत ते एकजीव होत नाही.
मग दुसरे अंडे फोडून घालावे व ते ही एकत्र करावे जोपर्यंत मुलायम मिश्रण तयार होत नाही.
ओव्हन २०० डीग्री सें वर प्री-हिट करायला ठेवावा.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावावा. असे दोन ट्रे तयार करावे.
पायपिंग बॅगमध्ये थोडे मिश्रण भरून घ्यावे.
पायपिंग बॅगने लंबगोलासारखे आकार (Swanच्या शरीराचा आकार)काढून घ्यावे. जर शेवटी टोक आले असल्यास पाण्याच्या बोटाने ते हलके चपटे करावे.
२०० डिग्री सें वर २०-२५ मिनिटे बेक करायला ठेवावे.
बेक झाले की कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी ठेवावे.
दुसर्या ट्रेवर इंग्रजी आकडा 2 जरा वाकडा काढावा ( Swanच्या मानेसारखा).
त्या आकड्याला डोक्यासारखे गोल आकार पाईप करुन घ्यावे व ओव्हन मध्ये २०० डिग्री सेंवर १०-१२ मिनिटे बेक करावे.
साहित्य सजावटीसाठी:
१ वाटी फ्रेश क्रिम
१/४ वाटी पेक्षा कमी साखर
व्हॅनिला एसेन्स
पाकृ:
क्रिम फेटणार ते भांडे काही तास आधी फ्रिजमध्ये गार करत ठेवावे तसेच हँड मिक्सर चे बीटर्स ही गार करत ठेवावे, असे केल्याने क्रिम लवकर फेटले जाते.
भांड्यात क्रिम ओतून मिडियम स्पीडवर फेटायला घ्यावे.
सॉफ्ट पीक्स आले की त्यात साखर व व्हॅनिला एसेन्स घालून थोडे घट्ट होईल इतके फेटावे.
पायपींग बॅगमधून पाईप करता आले पाहीज इतके फेटावे.
असेंब्लिंगः
तयार Swanच्या शरीराच्या आकराचे पफ्स घेऊन , वरून अलगद अर्धवट कापा.
कापलेल्या भागाचे दोन भाग करा, म्हणजे त्याचे पंख तयार होतील.
पोटाकडचा भाग जो आतून पोकळ आहे त्यात फेटलेले क्रिम भरा.
अलगद पंख लावा व 2 आकड्याचा शेवटचा भाग त्यात अलगद रोवून घ्या.
सर्व्हिंग प्लेटवर ठेवून त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुर्रून सर्व्ह करा Cream Puff Swans
- Sanika
- Distinguished Chef
- Posts: 38
- Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
- Name: Sanika Nalawde
Re: क्रिम पफ Swans
नुसते बघुनच डोळे तृप्त झाले. बापरे.....काय पाककृती, प्रेझेंटेशन आणि चिकाटी!!साष्टांग नमस्कार तुला!!!!!!!!!!!!
खरंच - नुसते बघत रहावेसे वाटतात - खायची हिम्मतच होणार नाही. :
काय निगुतीने आणि कल्पकतेने केले आहेत हे डौलदार स्वान - खरोखरंच राजबिंडे राजहंस दिसतात आहे. कुठल्याही fine dining रेस्टऑरंटची डेझर्टसची शोभा वाढवतील. किती कप्लकतेने आणि कलत्मकतेने एखादी डीश सादर करता येते त्याचे उत्तम उदाहरण. खूप, खूप सुरेख पाककृती आणि कलाकृती आहे ही.
फुडीमॅजिकची शोभा वाढवल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद! हीच पाककृती इंग्लिश मधेही देणार का? मराठी न समजणारेही खूप वाचक आहेत इथे, त्यांना खूप आनंद होईल.
खरंच - नुसते बघत रहावेसे वाटतात - खायची हिम्मतच होणार नाही. :
काय निगुतीने आणि कल्पकतेने केले आहेत हे डौलदार स्वान - खरोखरंच राजबिंडे राजहंस दिसतात आहे. कुठल्याही fine dining रेस्टऑरंटची डेझर्टसची शोभा वाढवतील. किती कप्लकतेने आणि कलत्मकतेने एखादी डीश सादर करता येते त्याचे उत्तम उदाहरण. खूप, खूप सुरेख पाककृती आणि कलाकृती आहे ही.
फुडीमॅजिकची शोभा वाढवल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद! हीच पाककृती इंग्लिश मधेही देणार का? मराठी न समजणारेही खूप वाचक आहेत इथे, त्यांना खूप आनंद होईल.
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 2 guests