मिठाई आणि डेझर्टस्

ड्रायफ्रुट्स मोदक

मिठाई, पक्वान्न आणि डेझर्टस्

ड्रायफ्रुट्स मोदक

Postby Sanika » Thu Sep 17, 2015 2:32 am



साहित्यः

१.५ वाटी सीडलेस खजूर, तुकडे करुन घ्यावे.
१/२ वाटी बदाम
१/२ वाटी काजू
१/४ वाटी बेदाणे
१/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट
२ टेस्पून खसखस
१/२ टीस्पून वेलचीपूड



पाकृ:

काजू-बदाम बेताचे चॉप करुन घेणे.



पॅनमध्ये काजू-बदाम कोरडेच हलक्या तांबूस रंगावर भाजून घेणे.
भाजलेले काजू-बदाम प्लेटमध्ये काढावे.
त्याच पॅनमध्ये आता खोबरे + खसखस सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
हे सुद्धा वेगळ्या प्लेटमध्ये काढावे.
पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यात चिरलेला खजूर व बेदाणे घालावे.
सतत परतावे, खजुर-बेदाण्याचा गोळा होऊन लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
मिश्रण गार होऊ द्यावे.



काजू-बदामाची मिक्सरवर भरडसर पूड करुन घ्यावी.
खजूर-बेदाणेच्या मिश्रणात काजू-बदामाची पूड, खोबरे + खसखस व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे.



पेढे-मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
हे मोदक अतिशय चविष्ट बनतात व ह्यात खजूराचा, बेदाण्याचा गोडवा पुरेसा होतो.
हे मोदक तुम्ही गणपतीत प्रसादाला देऊ शकता.
ह्या प्रमाणात १५-१६ मोदक होतात, जास्तं प्रमाणात बनवयाचे असतील तर साहित्याचे प्रमाण वाढवावे.



गणपती बाप्पा मोरया !!
तुम्हा सर्वांना गणेशोत्सावाच्या हार्दिक शुभेच्छा !!


__/\__
Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: ड्रायफ्रुट्स मोदक

Postby manish » Thu Sep 17, 2015 9:58 am

व्व्वा!!!!! :-)
मोदकांची अतिशय सोपी (वाटते तरी आहे) आणि चविष्ट रेसिपी गणेश चतुर्थीला दिल्याबद्द्ल मनापासून आभार!

एक शंका - खजूर+बेदाणे मिक्सर मधून एकजीव करायची गरज नाही का?
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: ड्रायफ्रुट्स मोदक

Postby Sanika » Tue Sep 22, 2015 2:30 am

हो हो ते फिरवून घ्यायचे मिक्सरला , सणाच्या घाई-गडबडीत विसरले लिहायला :) सॉरी
Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: ड्रायफ्रुट्स मोदक

Postby manish » Tue Sep 22, 2015 11:15 am

वाटलंच मला! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मिठाई आणि डेझर्टस्

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest