साहित्य-
२५० ग्राम साखर,२५० ग्राम मैदा,२५० ग्राम लोणी/तूप,
५ अंडी
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ
२ चहाचे चमचे वॅनिला अर्क, लिंबाची किसलेली साल चमचाभर
साधारण वाटीभर पिठीसाखर
साधारण ३ ते ४ लिंबांचा रस
कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,
अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे. लिंबाची किसलेली साल घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+चिमूटभर मीठ एकत्र करणे व ते घालून फेटणे.
केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ५५ ते ६० मिनिटे बेक करणे.
केक झाला की नाही ते नेहमीसारखेच सुई किवा सुरी खुपसून पाहणे.
केक झाला असेल तरीही ५ मि. अवनमध्येच राहू देणे.
नंतर बाहेर काढून कोमट झाला की जाळीवर काढून रुम टेंपरेचरला येऊ देणे.
नंतर मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही.
नंतर त्याला टूथ पिकने/टोचणीने/विणायच्या सुईने(विणायच्या सुईशी माझा एवढाच संबंध!) सर्व बाजूंनी भोके पाडणे.
लिंबांचा रस+ पिठीसाखर एका ट्रे/मोठ्या ताटलीत घेणे व त्यात हा केक उलट सुलट सर्व बाजूंनी घोळवणे.कडा जास्त घोळवणे.रस सगळीकडे लागायला हवा आणि केक च्या आतही जायला हवा.
गार झाल्यावर तुकडे करणे. गरम गरम कॉफीबरोबर खाणे.
हे तुकडे प्लास्टीक कागदात गुंडाळून प्लास्टीक डब्यात घालून डीप फ्रिझ मध्ये ठेवले तर ४/५ महिने टिकतात.
(अर्थात तसेही ते खाण्यातून उरायला तर हवेत..!)
मिठाई आणि डेझर्टस्
केकावली-५. झित्रोन कुकन (लेमन केक)
2 posts
• Page 1 of 1
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: केकावली-५. झित्रोन कुकन (लेमन केक)
अहाहा....लिंबाच्या चवीचा केक मस्तच लागेल. नुसत्या विचारांनीही तोंडाला पाणी सुटले!!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 23 guests