मिठाई आणि डेझर्टस्
केकावली-३.मार्बल केक(प्रकार१)
3 posts
• Page 1 of 1
केकावली-३.मार्बल केक(प्रकार१)
साहित्य-
२५० ग्राम मैदा,
२५० ग्राम तूप/लोणी/मार्गारिन,
२५० ग्राम साखर
२ चहाचे चमचे भरून बेकिंग पावडर, १चिमूट मीठ,
५ अंडी, १/४कप दूध
१.५ चमचा वॅनिला अर्क,
२ ते २.५ मोठे चमचे कोको पावडर
कृती-
तूप चांगले फेसून घ्या,साखर घालून फेसा/फेटा/बिट करा.
अंडी घालून फेसा.नंतर वॅनिला अर्क घालून फेसा.
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करा आणि वरील मिश्रणात हळूहळू मिसळा.
नंतर थोडे दूध घालून मिश्रण एकजीव करा.
आता मिश्रणाचे २ भाग करून वेगवेगळ्या वाडग्यात काढून घ्या.
एका भागात कोको पावडर घाला व चांगले मिक्स करा.
दुसरा वॅनिलायुक्त भाग तसाच पांढरा ठेवा.
केकच्या साच्याला तूप लावून घ्या.
दोन चमचे कोकोयुक्त मिश्रण आणि २ चमचे वॅनिलाचे साधे मिश्रण असे दोन्ही मिश्रणे संपेपर्यंत घाला.
साचा तिरपा करून मिश्रण सगळीकडे सारखे पसरवून घ्या.
अवन प्रीहिट करून घ्या.
१८० अंश से.ला ३५ ते ४० मिनिटे बेक करा.
केक झाला की नाही ते (त्याच्या) पोटात विणायची सुइ किवा सुरी खुपसून पहा.
केक झाला असेल तरीही ५ मि. अवनमध्येच राहू द्या.
नंतर बाहेर काढा व कोमट झाला की जाळीवर काढून रुम टेंपरेचरला येऊ द्या.
नंतर स्लाइस कापा.
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
Re: केकावली-३.मार्बल केक(प्रकार१)
ही केकावली सिरीज फार मस्त होतेय!! एकाहून, एक केक - या केक मधला मारबल इफेक्ट मस्त वाटतोय! मी बेकिंक शिकायच खरंच मनावर घेतोय आता!
माझी एक शंका आहे - ह्याच केकबद्द्ल अशी नाही, पण एकूणच केकबद्द्ल - विकतचे केक (खास करून बेकर्स बास्केट किंवा ब्रेड स्टोरीचे) खूप हलके, सॉफ्ट आणि मॉईस्ट असतात - काही केले तरी घरी तसे नाही बनत, असे का होत असेल?

- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
Re: केकावली-३.मार्बल केक(प्रकार१)
शंकासमाधान-
केक करताना फेटणे खूप महत्त्वाचे आहे,जितके फेटाल तितका केक हलका होतो.
तसेच बेक करणेही. बेकिंग साठी चांगला अवन असणे आवश्यक.
आणि सगळे जिन्नस अगदी प्रमाणात घेणे..
शेवटी प्रॅक्टिसने आपलाही केक अगदी बेकरीवाल्यांसारखा सॉफ्ट्,हलका आणि मॉइस्ट.. इ. इ. होतो.
केक करताना फेटणे खूप महत्त्वाचे आहे,जितके फेटाल तितका केक हलका होतो.
तसेच बेक करणेही. बेकिंग साठी चांगला अवन असणे आवश्यक.
आणि सगळे जिन्नस अगदी प्रमाणात घेणे..
शेवटी प्रॅक्टिसने आपलाही केक अगदी बेकरीवाल्यांसारखा सॉफ्ट्,हलका आणि मॉइस्ट.. इ. इ. होतो.
- swatidinesh
- Master Chef
- Posts: 28
- Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
- Name: Swati Dinesh
3 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 34 guests