मिठाई आणि डेझर्टस्
फिरनी
3 posts
• Page 1 of 1
फिरनी
साहित्यः
दूध (म्हशीचे अथवा फुल्-क्रिम) - २ लिटर
तांदूळाचा रवा (इडली रवा) - १५० ग्रॅम (चहाचा एक कप किंवा एक मोठी वाटी)
खवा - १२५ ग्रॅम (पाऊण वाटी)
साखर - १ कप
वेलची पावडर - १/२ टी स्पून
गुलाब एसेन्स अथवा गुलाब जल - अंदाजाने
बदाम-पिस्ता काप - थोडेसे
चांदीचा वर्ख - सुशोभीकरणासाठी (वैकल्पिक -[Optional])
कृती:
खवा कुस्करून मोकळा करून ठेवा.
तांदूळाचा रवा पाण्यात एक तास भिजवून ठेवा (पाणी रव्याच्या पातळीच्या वर राहिले पाहिजे.)
२ लिटर दूध उकळण्यास ठेवा. दूध उकळून १-१/२ लिटर (अंदाजाने) झाले पाहिजे.
आंच कमी करून, भिजवून निथळवलेला रवा दूधात मिसळा.
रवा-दूध मिश्रण दाट होईस्तोवर ढवळत राहा.
दाट झाल्यावर खवा,साखर, वेलची पावडर आणि बदाम-पिस्ता काप त्यात मिसळा.
कस्टर्ड सारखे दाट होई पर्यंत ढवळा.
आता गॅस बंद करून फिरनी खाली उतरवा. आवडीनुसार गुलाब एसेन्स किंवा गुलाब जल मिसळा.
थंड करून छोट्या छोट्या बाऊल्स मधे अथवा मातीच्या वाट्यांमधे काढून फ्रिज मध्ये ठेवा आणि चांदीचा वर्ख लावून सादर करा.
शुभेच्छा....!
- PrabhakarPethkar
- Distinguished Chef
- Posts: 2
- Joined: Thu Jul 17, 2014 9:13 pm
- Name: Prabhakar Pethkar
Re: फिरनी
ही माझी अतिशय आवडती पाककृती. पहिल्यांदा ५-६ वर्षांपुर्वी मिपावर पहिली होती तेंव्हाच खूप आवडली होती. हौसेने केली होती जरा काजू आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवली होती. खूप जणांना 'इंम्प्रेस' केले होते तेंव्हा अशी खास डीश बनवून!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
3 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 7 guests