पार्श्वभूमी:
फुडी-मॅजिक आज सर्वांसाठी प्रकाशित केले त्याबद्दल फुडी-मॅजिकच्या टीमचे मनःपुर्वक अभिनंदन!
हे मॉकटेल ही पुर्णपणे माझे इंप्रोवायझेशन आहे, नावासहीत. आता असे मॉकटेल असुन कोणी ते ट्राय केले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

साहित्य:
मिंट (पुदीना) सिरप - 1 औस (30 मिली)
लेमन आणि/किंवा आले कॉर्डिअल - 10 मिली
ताज्या मोसंबीचा रस - 10 मिली
ताज्या मोसंबीची एक चकती सजावटीसाठी
सोडा
बर्फ
ग्लास - मॉकटेल ग्लास

कृती:
शेकर मधे 3/4 बर्फ भरून घ्या. त्यात मिन्ट सिरप ओतुन घ्या. आता एकास चार ह्या प्रमाणात पाणी टाकुन घ्या. (30मिली * 4)
आता बाकीचे सर्व साहित्य शेकर मधे ओतुन घ्या. हे सर्व मिश्र ण शेकरमधे 4-5 मिनिटे मस्त शेक करुन घ्या. मॉकटेल तयार होण्याची खुण म्हणजे शेकरवर बाहेरुन जमा झालेले बाष्प. आता मॉकटेल ग्लासमधे मिश्रण गाळुन घ्या. सोडा टाकुन ग्लास टॉप अप करा. (सोडा ह्या मॉकटेलसाठी मस्ट आहे बरं का, तो वगळल्यास चव बदलु शकते मग ती माझी जबाबदारी नाही)
चला तर मग ग्रीन डिलाइट तयार आहे.


अश्या प्रकारेही सजावट करू शकता


