मांसाहारी पाककृती

स्टर फ्राइड चायनिज चिकन

सर्व मांसाहारी (आणि अंडे असलेल्या) पाककृती

स्टर फ्राइड चायनिज चिकन

Postby swatidinesh » Sun Aug 03, 2014 3:18 pm



साहित्य-

५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस
हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची १/२ वाटी प्रत्येकी- चौकोनी तुकडे. रंगीत मिरच्या उपलब्ध नसतील तर हिरवी भोपळी मिरची
२-३ कांदापाती,१ मध्यम कांदा
पेरभर आलं ,
२ मोठ्या किवा ३-४ लहान लसूण पाकळ्या
२ सुक्या लाल मिरच्या
१ टेबलस्पून शेजवान सॉस
२टेबलस्पून सोयासॉस
१ टीस्पून मिरपूड
१/२ चमचा साखर
२ टेबलस्पून वाइनविनेगर, ते उपलब्ध नसेल तर साधे विनेगर + कुकिंगवाइन/व्हाइटवाइन प्रत्येकी १-१ टेबलस्पून,
अथवा २-३ टेबलस्पून लिंबाचा रस + १ टेबलस्पून कुकिंगवाइन/व्हाइटवाइन
(ज्यांना वाईन नको असेल त्यांनी घालू नये.)
२ टेबलस्पून कॉर्नस्टार्च
१/४ चमचा एमएसजी (अजिनोमोटो) -ऑप्शनल
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल +१चमचा ऑलिव ऑइल

कृती-

चिकनपिस धुवून साधारण इंचभराचे लांब लांब तुकडे करून घ्या.
त्यात १चमचा ऑलिवऑइल, २ चमचे वाइनविनेगर, १चमचा मिरपूड, १चमचा सोयासॉस, १चमचा कॉर्नस्टार्च घाला, किंचित मीठ घाला व चिकनपिसना ते चोळा, एकत्र करून मुरवत ठेवा.
रंगीत भोपळी मिरच्यांचे चौकोनी तुकडे (जरा मोठेच)करा.
कांदा चौकोनी चिरा.तुकडे थोडे मोठेच असू द्या.
आलं व लसूण बारीक चिरा.
कांदापात बारीक चिरा.
एका कढईत चमचाभर तेल गरम करा,
त्यात मोठ्या आचेवर लसूण व आल्याचे तुकडे घाला व परता. लाल मिरच्या घालून परता.
कांदा , भोपळीमिरच्या घालून परता. किंचित मीठ घाला.
सोयासॉस, शेजवानसॉस घाला व परता.
भाज्या क्रंचीच राहू द्या, त्या बाजूला काढून ठेवा.
सर्व वेळ आच मोठी राहू द्या.
आता त्याच कढईत चमचाभर तेल घालून गरम करा, त्यात चिकनचे मुरवलेले तुकडे घाला व मोठ्या आचेवर परतत रहा, चिकन शिजू द्या. पण क्रंची राहू द्या.
चिकन झाले की त्यात भाज्या घाला व एकत्र करा.
थोड्या पाण्यात कॉर्नस्टार्च विरघळून घाला.
आपण भाज्यांमध्ये व चिकनमध्ये मीठ घातलेले आहे व एमएसजीही खारट असते हे लक्षात घेऊन मीठ व एमएसजी घाला.
किंचित साखर घाला.
कांदापात घाला.
सर्ववेळ आच मोठी राहू द्या.
फ्राइड राइस अथवा न्यूडल्स बरोबर खा.

swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: स्टर फ्राइड चायनिज चिकन

Postby manish » Mon Aug 04, 2014 11:45 am

मस्त दिसतेय हे - ह्याचे व्हेज व्हर्जन मश्रूम, पनीर टाकून करून पहायला हवे! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मांसाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests