मांसाहारी पाककृती

रविवार पेश्शल : तंदुरी चिकन

सर्व मांसाहारी (आणि अंडे असलेल्या) पाककृती

रविवार पेश्शल : तंदुरी चिकन

Postby Pratik » Sun Apr 06, 2014 8:44 pm



आज रविवार, पै पाहुण्यांचा दिवस म्हणजेच कोंबडीचा घातवार.
नेहमीच्या तांबड्या-पांढर्याि रश्याला फाटा देउन आज तंदुरी करायचा घाट घातला होता.



साहित्यः




२ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.)
२-३ मोठे चमचे तंदुर मसाला.
१-२ चमचे लाल तिखट.
१/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.)
२ चमचे तेल.
१-२ चमचे आल-लसुण पेस्ट.
२ चमचे लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.




१ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली.


कृती:





एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे.




कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी.



ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.


Pratik
Master Chef
 
Posts: 14
Joined: Tue Mar 25, 2014 5:55 pm
Name: Pratik Thakur

Re: रविवार पेश्शल : तंदुरी चिकन

Postby manish » Sun Apr 06, 2014 10:59 pm

काय ते फोटो आणि रंग..मी नॉन-व्हेज खात नाही, पण ही तंदूरी कातिल आहे :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मांसाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest