मांसाहारी पाककृती

फ्रेंच टोस्ट

सर्व मांसाहारी (आणि अंडे असलेल्या) पाककृती

फ्रेंच टोस्ट

Postby Sanika » Sat Oct 18, 2014 12:11 pm



साहित्यः
२ अंडी
४ शिळे ब्राऊन ब्रेड स्लाईसेस (तुम्ही कुठलाही ब्रेड वापरू शकता व्हाईट ब्रेड, Challah ब्रेड, फ्रेंच Baguette पण शिळा वापरावा म्हणजे ब्रेड मिश्रण चांगले सोषून घेईल)
१/२ वाटी दूध
साखर चवीप्रमाणे
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स



पाकृ:

अंडी फोडून घेणे. त्यात दूध, साखर, व्हॅनिला एसेन्स घालून चांगले फेटून घेणे.
नॉन-स्टीक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा रोजच्या वापरातले तेल घालून गरम करावे. तुम्ही बटर ही वापरू शकता.
अंड्याच्या मिश्रणात ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूंनी चांगले बुडवून घ्यावे व पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरीरंगावर शॅलो फ्राय करुन घ्यावे.
अशा पद्दतीने इतर ब्रेड स्लाईसेस फ्राय करुन घ्यावे.



तयार फ्रेंच टोस्टवर पिठीसाखर भुरभुरून ब्रेकफास्टला सर्व्ह करा.



नोटः

तुम्हाला फ्रेंच टोस्ट अजून रीच बनवायचा असल्यास त्यात दुधाबरोबर थोडे क्रिम वापरू शकता.
सर्व्ह करताना तुम्ही टोस्टवर मेपल सिरप, मध ड्रिझल करु शकता.
बटर व बेरीजबरोबर ही सर्व्ह करता येतं.
ह्यात व्हॅनिला एसेन्सऐवजी तुम्ही दालचिनीपूडचा वापर किंवा तिखट बनवायचे असल्यास मीठ, मिरपूड, लाल तिखट किंवा कुठलाही स्पायसी सॉस, चीज अंड्याच्या मिश्रणात घालून करु शकता.
ही पाकृ एगलेस बनवायची असल्यास बेसनात थोडे हळद, लाल तिखट, मीठ, चिरलेली कोथींबीर, मिरची घालून त्यात ब्रेड घोळवून शॅलो फ्राय करु शकता.
Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: फ्रेंच टोस्ट

Postby manish » Sat Oct 18, 2014 8:36 pm

मस्त प्रेझेंडेशन....नेहमीप्रमाणेच!! :-)
तिखट फ्रेंच टोस्ट खाल्ला आहे, पण असा गोड पहिल्यांदाच पाहतोय! पीठीसाखर भुरभुरल्यावार सुरेख दिसतात आहे.

अवांतरः हे फ्रेंच टोस्ट बघुन क्वीन चित्रपटातील फ्रेंच टोस्टचा सीन आठवला! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to मांसाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest