शाकाहारी पाककृती

गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

Postby mrunalini.salvi » Tue Aug 05, 2014 12:42 am

सहित्यः

राऊंड ब्रेड - १
लसुण पाकळ्या - ८-१०
बटाटा - १
चिकन स्टॉक - ३ कप
ब्रेड स्लाईस - २
काळि मिरी पावडर - १/२ चमचा
बेसिल - १/४ चमचा
ओरेगानो - १/४ चमचा
चीज - २ चमचे
बटर - २ चमचे
मिठ चवीनुसार

कृती:

१. लसुण पाकळ्या सोलुन बारीक चिरुन घ्याव्या. बटाट्याचे देखिल काप करुन घ्यावेत.
२. कढईत butter गरम करावे. त्यात चिरलेला लसुण व बटाटा टाकुन परतुन घ्यावे.
३. ते थोडे परतल्यावर त्यात चिकन स्टॉक टाकुन, १०-१५ मिनिटे किंवा बटाटे शिजे पर्यंत सुप उकळु द्यावे.
४. सुपला उकळी आल्यावर त्यात २ ब्रेडच्या स्लाईसचे तुकडे करुन टाकावेत.
५. सुप मधे काळि मिरी पावडर, बेसिल, ओरेगानो व चवीनुसार मिठ टाकुन गॅस बंद करावा.
६. हे सुप मिक्सर मधे १-२ वेळा फिरवुन घ्यावे. त्यामुळे सुप smooth होईल.
७. राउंड ब्रेडचा वरचा थोडासा भाग कापुन, आतला ब्रेडचा भाग काढुन घ्यावा. साधारण पणे त्याला बाऊलचा आकार यायला हवा.



८. आता ब्रेड बाऊलला आतुन थोडे बटर लावुन, ओव्ह्न मधे २४० degree celcius ला ५-७ मिनिट भाजुन घ्यावा. त्यामुळे ब्रेड मस्त crispy होतो.
९. तयात झालेल्या ब्रेड बाऊल मधे सुप ओतुन, वरतुन चिज टाकुन, गरम-गरम serve करावे.









टिपः

१. तुम्ही हवे असल्यास ब्रेड घरी देखिल करु शकता. ब्रेडचि पाकृ तुम्ही येथे पाहु शकता.
२. कृती सर्व सारखीच असेल, फक्त ब्रेडचा आकार थोडा मोठा करावा लागेल.
3. तुम्ही चिकन स्टॉक ऐवजी व्हेज स्टॉक देखिल वापरु शकता.
४. मी हा ब्रेड घरी बनवला आहे. त्यामुळे मी मध्यम आकाराचा ब्रेड बनवला होता.
mrunalini.salvi
A Cook In The Making
 
Posts: 4
Joined: Thu Jul 17, 2014 11:22 pm

Re: गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

Postby manish » Tue Aug 05, 2014 11:02 am

माझी अतिशय आवडती पाककृती. इथे दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद. अजून्ही पाव घरी जमेल असे वाटत नाही, पण ही आयडिआ मस्त आहे - विकतचे पाव अणून प्रयत्न करावा म्हणतोय! नाहितर नुसते सूप तरी ट्राय करतो आधी!
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

Postby manish » Thu Aug 14, 2014 11:56 am

कालच केले होते नुसते 'गालिर्क सुप' (ब्रेड बाऊल शिवाय), माझ्याकडे साधारण ४-४.५ कप व्हेज स्टॉक होता, म्हणून १.५ बटाटा घेतला (तेवढाच होता घरात), आणि सूप मधे ब्रेड टाकली नाही. त्याऐवजी वरून छोटे गार्लिक टोस्ट टाकले. सूप छान झाले होते,पण बरेच पातळ. पुढच्या वेळेस जास्त बटाटे टाकून बघतो कसे होते.

अजून एक शंका - बेसिल, ओरेगानो हे ताजे/हिरवे घ्यायचे की ड्राईड हर्ब्स?

IMAG0768.jpg
Garlic Soup
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

Postby mrunalini.salvi » Tue Aug 19, 2014 2:11 am

थँक्स मनिष. हो. बेसिल, ओरेगॅनो ड्राय घेतले तरी चालतील. मी ड्रायच वापरले होते! :)
mrunalini.salvi
A Cook In The Making
 
Posts: 4
Joined: Thu Jul 17, 2014 11:22 pm


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest