शाकाहारी पाककृती

टि टाईम स्नॅक्स - राजस्थानी तिक्कर

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

टि टाईम स्नॅक्स - राजस्थानी तिक्कर

Postby DeepakD » Wed Jul 23, 2014 6:44 pm



साहित्यः
१. मक्याचं पीठ - १ बाउल
२. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल
३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या)
४. साजुक तुप - २ मोठे चमचे
५. गव्हाचं पीठ - १ बाउल
६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर
७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल
८. चवीनुसार मीठ
९. तिक्कर भाजण्यासाठि साजुक तुप किंवा बटर



कृती:
१. एका बाउल मधे मक्याचं आणि गव्हाचं पीठ एकत्र करुन त्यात साजुक तुप घालुन सारखं करा. तुप सर्व पिठाला लागेल असं बघा. असं केल्याने तिक्कर आतुन खुसखुशीत होतो


२. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेले टोमॅटो, वाटलेली पेस्ट, कोंथिंबीर, गाजर आणि चवीनुसार मीठ घालुन गोळा मळा. शक्यतो पाण्याची गरज भासत नाहि. टोमॅटो आणि वाटलेल्या पेस्ट्चा अंगभुत ओलावा पीठ मळण्यास पुरेसा होतो.




३. पोळपाटावर पीठ पसरुन थालीपीठ थापतो त्या प्रमाणे तिक्कर थापा. स्टिलचं उलथण्यानी अलगद काढुन नॉन स्टिक तव्यावर साजुक तुप / बटर घालुन दोन्हि बाजुनी खरपुस भाजा





४. गरमागरम तिक्कर आवडत्या चटणी, सॉस, लोणचं किंवा चहासोबत सर्व करा.



टिपः
१. ह्यात वेगवेगळ्या भाज्या घालुन वेगवेगळ्या प्रकारे तिक्कर करता येईल. उदा. बारीक चीरलेल्या कांद्याची पात + पालक घालुनहि छान लागेल
DeepakD
Distinguished Chef
 
Posts: 8
Joined: Thu Apr 10, 2014 12:48 pm
Name: Deepak S. Dandekar

Re: टि टाईम स्नॅक्स - राजस्थानी तिक्कर

Postby manish » Wed Jul 23, 2014 8:29 pm

हा मस्त स्नॅकचा प्रकार आहे. तुपामुळे एक वेगळीच खुमारी येत असेल ह्या पदार्थाला! मला लोणी, दही आणि लोणच्याबरोबर खायला आवडेल ह्या पावसाळ्याच्या दिवसात आणि बरोबर गरमागरम कॉफी!! अहाहा!! :)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests