शाकाहारी पाककृती

पौष्टिक मेथी धिरडे

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

पौष्टिक मेथी धिरडे

Postby Sanika » Tue Jul 22, 2014 12:24 pm

साहित्य मेथी धिरडे पीठः

६ वाट्या तांदूळ
२ वाट्या तूरडाळ
२ वाट्या चणाडाळ
२ वाट्या उडीदडाळ
२ वाट्या ज्वारी
१ वाटी गहू
१ वाटी धणे
१/२ वाटी मेथीदाणे

वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा.

साहित्यः

२ वाट्या तयार धिरडे पीठ
१०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते)
१/२ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल



पाकृ:

पिठात हळद, लाल तिखट, ठेचलेले लसूण, मीठ व दोन चमचे तेल घालावे.
एक वाटी पीठ असल्यास २ वाट्या पाणी असे प्रमाण आहे, त्याप्रमाणे पाणी घालून , नीट मिक्स करावे.
नॉन-स्टीक तवा गरम करुन घ्यावा व मंद आच करून थोडे तेल ब्रश करुन, वाटीने पीठ ओतावे.
थोडे तेल सोडून एका बाजूने छान होऊ द्यावे मग उलटवून दुसरी बाजू शिजु द्यावी.



गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: पौष्टिक मेथी धिरडे

Postby manish » Tue Jul 22, 2014 1:26 pm

मेथी ही माझी अगदी आवडती भाजी! पण ह्यात फक्त मेथीदाणे आहेत - वरून चिरून मेथी टाकली तर जास्त कडू तर होणार नाही ना?
हे आता करून बघितलेच पाहिजे!

बाकी फोटो आणि सविस्तर पाककृती नेहमीप्रमाणेच ए-१!! अजून नवीन काय बोलणार?
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests