तर ह्याकरता लागणारे साहित्य -
साहित्य
१ जुडी कोथिंबिर,
१ टे. स्पून तिखट,(तिखटाचे प्रमाण कोथिबिरीच्या प्रमाणानुसार आणि स्वत:च्या जिभेच्या तिखटपणानुसार कमीजास्त करता येईल.)
१ टेबलस्पून जिरेपूड, चवीनुसार मीठ.
३-४ चमचे डाळीचे पीठ, १ चमचा तांदळाची पीठी,
थोडे तेल, खायचा सोडा २ चिमूट.
कृती
कोथिंबिर निवडून, धुवून, चिरून घ्या. त्यात तिखट, जिरेपूड घाला. चमचाभर तेल (गरम न करता) घाला.
३-४ चमचे डाळीचे पीठ (बेसन) घाला. चमचाभर तांदळाचे पीठ घाला चवीनुसार मीठ घाला. पाणी घालून सरसरीत भिजवा. २ चिमूट सोडा घाला व चांगले ढवळा.
कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्या, त्यात हे मिश्रण घाला आणि शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवा.
पूर्ण गार झाले की वड्या पाडा आणि तळा, शॅलो फ्राय करा किवा एअर फ्राय करा.
एअर फ्राय करताना- १८० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा.
वड्यांवर तेलाचा ब्रश फिरवा आणि ६ मिनिटे १८० अंशावर ठेवा. मग उघडून वड्या पलटून परत ३-४ मिनिटे ठेवा.उघडून पहा, वाटल्यास अजून एखादा मिनिट ठेवा.
खमंग आणि कुरकुरीत कोथिंबिर वड्यांचा आस्वाद घ्या.
