२ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर
२ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर,
फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ
कृती-
शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला. थोडे ओले खोबरे घाला.चांगली वाफ येऊ द्या.
खोबरे आणि कोथिंबिरीने सजवा.(फोटोतल्या डिशमध्ये खोबरे आणि कोथिंबिर घातलेले नाहीये..)
खाताना लिंबू पिळून खा.
