शाकाहारी पाककृती

शेवयांचा तिखटमीठाचा शिरा

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

शेवयांचा तिखटमीठाचा शिरा

Postby swatidinesh » Fri Oct 16, 2015 11:53 am



साहित्य-

२ वाट्या शेवया,
१ लहान कांदा,१ लहान टोमॅटो,
२ हिरव्या मिरच्या, ४-५ कढिलिंबाची पाने,
१ मूठभर शेंगदाणे,
मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर,
फोडणीचे साहित्य, एक पळी तेल
ओले खोबरे, कोथिंबिर,
२ वाट्या गरम पाणी

कृती-

शेवया कोरड्याच तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा.
जर भाजलेल्या शेवया असतील तर किंचित भाजून घ्या.
फोडणी करून त्यात कांदा,टोमॅटो,शेंगदाणे घाला व परता. झाकण ठेवून शिजू द्या.
भाजलेल्या शेवया घाला. मीठ व साखर घाला आणि सगळे एकत्र करून परता.
त्यात आधण पाणी ओतून ढवळा व चांगली वाफ येऊ द्या.
ओले खोबरे व कोथिंबिर घाला.

आमच्याकडे उपमा म्हणजे जिरं मोहरी उडदाची डाळ वाली फोडणी.. (पांढरा)
शिरा म्हणजे गोडाचा शिरा
किवा तिखटमीठाचा शिरा- हळद,हिंग अशी नेहमीची फोडणी (पिवळा)
swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: शेवयांचा तिखटमीठाचा शिरा

Postby manish » Fri Oct 16, 2015 1:41 pm

मस्त दिसतोय हा तिखटमीठाचा शिरा! मला शेवयांची खीर फारशी आवडत नाही, पण हा नक्की आवडेल.
आणि हो, पांढरा उपमा आणि पिवळा शिरा हे समजावल्याबद्दल धन्यवाद :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests