शाकाहारी पाककृती

टोमॅटो पुरी

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

टोमॅटो पुरी

Postby swatidinesh » Fri Jul 03, 2015 6:33 pm



साहित्य-

टोमॅटो प्युरी १ वाटी किवा मोठे २ चांगले लालबुंद टोमॅटो,
मिरपूड, धनेजिरे पूड, ओवा - प्रत्येकी १ लहान चमचा,
तिखट व मीठ - स्वादानुसार
कणिक, तेल

कृती-

टोमॅटो पाण्यात घालून उकळणे, ते शिजत आले की चाळणीवर घालणे आणि जरा कोमट झाले की साले काढून उरलेला गर कुस्करणे व नंतर मिक्सर मधून फिरवून घेणे.
किवा- तयार प्युरी घेणे. त्यात तिखट, धनेजिरे पूड, मिरपूड, ओवा, तिखट, मीठ घालणे.चमचाभर तेल घालणे. त्यात मावेल एवढी कणिक घालून घट्टसर भिजवणे.१५-२० मिनिटे झाकून ठेवणे.
तेल तापत ठेवणे.
पुर्‍या लाटून मध्यम आचेवर तळणे.
हिरव्या चटणीबरोबर खाणे.

चटणी- २-३ मिरच्या चिरुन, कोथिंबिर,२ लसूणपाकळ्या, एका पेराएवढं आलं, मीठ चवीनुसार, १/२ चमचा साखर हे सगळे एकत्र करुन मिक्सर मधून फिरवणे, थोडे पाणी घालणे.
swatidinesh
Master Chef
 
Posts: 28
Joined: Sun May 18, 2014 7:20 pm
Name: Swati Dinesh

Re: टोमॅटो पुरी

Postby manish » Fri Jul 03, 2015 9:04 pm

अरे वा! मस्त दिसतात लाल-लाल टमाटम फुगलेल्या पुर्‍या! एका मागोमाग-एक चविष्ट रेसिपी इथे दिल्याबद्द्ल धन्यवाद! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests