शाकाहारी पाककृती

रॉ मँगो राईस (कैरी-भात)

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

रॉ मँगो राईस (कैरी-भात)

Postby Sanika » Wed May 06, 2015 1:40 pm



साहित्यः

२ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात असेल तरी चालेल)
१ वाटी कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्तं घ्यावे)
२ हिरव्या मिरच्या चिरून
कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून चणाडाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
१ टेस्पून काजू (तुम्ही शेंगदाणे ही वापरु शकता)
मीठ चवीनुसार
खोबरेल तेल (रोजचे वापरातले तेल घेतले तरी चालेल)



पाकृ:

भांड्यात खोबरेल तेल गरम करून मोहरी. मेथ्या, डाळी व हिंगाची फोडणी करावी.
डाळी लालसर परतल्या गेल्या की त्यात हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता व काजू घालून परतून घ्यावे.
आता त्यात हळद घालून वरून शिजवलेला भात घालावा व मिक्स करावे.
आता त्यात कैरीचा कीस, मीठ घालून हलके मिक्स करुन घ्यावे.
झाकण ठेवून एक वाफ काढावी.



हा भात तुम्ही लोणचं, पापड किंवा रस्समसोबत सर्व्ह करु शकता.
आधी करुन ठेवला तर कैरीचा स्वाद छान मुरेल.

Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: रॉ मँगो राईस (कैरी-भात)

Postby manish » Thu May 07, 2015 2:58 pm

मस्त!! रेसिपी आवर्जून इथे दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद!!
आणि हो! हा राईस बनवायला सोपा दिसतोय, करून बघेन! खोबरेल तेल वापरायला काही खास कारण? तूपही वापरता येईल - करून बघायला पाहिजे!
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: रॉ मँगो राईस (कैरी-भात)

Postby manish » Thu May 07, 2015 3:02 pm

बाकी फोटो तूच काढतेस की अजून कोणी? प्रोफेशनल फुड फोटोग्राफरच्या तोंडात मारतील इतके देखणे असतात! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: रॉ मँगो राईस (कैरी-भात)

Postby Sanika » Thu May 07, 2015 6:58 pm

खोबरेल तेलाने छान स्वाद येतो पदार्थाला, तुपाचा ही वापर चालेल असे वाटतेय , ट्राय करुन सांग :)

हो हे सर्व फोटो मीच काढते स्टेप-बाय-स्टेप, अगदीच गरज वाटली तर नवर्‍याला सांगते :)
धन्यवाद.
Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: रॉ मँगो राईस (कैरी-भात)

Postby manish » Thu May 14, 2015 12:17 pm

हा करून बघितला...साध्याच तेलात. मस्त चव आली होती, आमची कैरी जरा जास्तच आंबट होती, ती चव छान लागत होती! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: रॉ मँगो राईस (कैरी-भात)

Postby neha » Thu Jun 11, 2015 3:02 pm

मस्त दिसतो आहे हा,कैर्‍या संपायच्या आत करून पहयला पाहिजे! :-)
neha
A Cook In The Making
 
Posts: 19
Joined: Tue May 13, 2014 10:01 pm
Name: Neha Pune


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 33 guests