शाकाहारी पाककृती

बाबा गनुश

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

बाबा गनुश

Postby Pratik » Tue Apr 07, 2015 3:00 pm

मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश.

आज त्या पैकी बाबा गनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे.

खुबुस वा पिट्टा ब्रेडला सोबत करण्यासाठी बाबागनुश हे एक प्रकारच डिपिंग आहे.

साहित्य :

एक मोठं किंवा २ माध्यम वांगी.

३ मोठे चमचे ताहिनी. (भाजलेल्या तिळाची तेलात वाटलेली पेस्ट.)

२ लिंबांचा रस.

२-३ पाकळ्या लसूण

चवी नुसार मीठ.

२-३ चमचे ताजं घट्ट दही (ऑपश्नल)

सजावटीसाठी : ऑलीव्हचं तेल, ऑलीव्ह, लाल तिखट, कोथिंबीर.

कृती :


वांग्याला काट्याने टोचे मारून वरून तेलाचं बोट फिरवावं.

निखारे असल्यास उत्तम पण नसल्यास शेगडीवर वांगं भाजून घ्यावं.

(ओव्हन मध्येही भाजता येईल पण त्याला खूप वेळ लागतो साधारण ४५-५० मिनिटे.)



भाजलेलं वांगं गार झाल्यावर वरच साल काढून टाकावं आणि काट्या/चमच्याने वांग्याचा गर मोडून घ्यावा.



एका बाऊलमध्ये ताहिनी आणि लिंबाचा रस फेटून घ्यावा. सुरवातीस फेटताना मिश्रण एकदम घट्ट जाणवेल, पण नंतर हलकेपणा जाणवायला लागेल.



नंतर त्यात आवडी नुसार ताजं दही घालून फेटावं.



वांग्याच्या मोडलेल्या गरावर वरील मिश्रण, लसणाच्या पाकळ्या आणि चवी नुसार मीठ, लाल तिखट टाकून फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून घ्यावं.



साधारण श्रीखंडाची घनता येईल. वाढताना थोडं ऑलीव्ह्च तेल टाकून वरून लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ऑलीव्ह लावून सजवावं.



खबुस किंवा पिटा ब्रेड सोबत डिपिंग म्हणून सर्व्ह करावं.
Pratik
Master Chef
 
Posts: 14
Joined: Tue Mar 25, 2014 5:55 pm
Name: Pratik Thakur

Re: बाबा गनुश

Postby manish » Wed Apr 08, 2015 12:33 pm

माझ्या आवडत्या डीप पैकी एक, आम्ही हे पराठ्यांबरोबरही आवडीने खातो - इतकी छान रेसिपी आणि इतक्या देखण्या पप्रेझेंटेशन बरोबर दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 5 guests