साहित्य -
५०० ग्रॅम मश्रुम्स (शक्यतो लहान आकाराचे घेतले तर जास्त चांगले)
१ मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून
चवीपुरते मीठ
२-३ टेबलस्पून तेल
मिरपूड
कोथिंबीर
गार्लिक सॉस/डिप साठी
४-६ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या (आवडीनुसार कमी जास्त)
१/३ वाटी घट्ट दही/योगर्ट
१/३ Crème fraîche / सावर क्रीम
१/३ वाटी मेयोनीज (ऑप्शनल)
कृती -
गार्लिक सॉस विकत मिळाल्यास ते थोड्या दह्यात मिसळून किंवा तसेच वापरू शकता. अन्यथा हे खालीलप्रमाणे घरी करू शकतो.
१/३ वाटी घट्ट दही, १/३ Crème fraîche / सावर क्रीम (Sour Cream), १/३ वाटी मेयोनीज (Mayonnaise) हे सगळे एकत्र करून घ्या. यात चवीपुरते मीठ घाला. लसूण पाकळ्या बारीक करून घाला. आवडत असल्यास सुकवलेली कोथिंबीर, शेपू, कांद्याची पात किंवा तत्सम हर्ब्ज घाला. सर्व मिसळून घ्या. सॉस तयार आहे.
मेयोनीज वगळून सुद्धा हे करता येते. लसणाची अजून चव हवी असल्यास लसूण पावडर सुद्धा वापरू शकता.
मश्रुम्सचे देठ काढून घ्या. मोठे मश्रुम्स असतील तर अर्धे तुकडे करू शकता.
एका भांड्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात कांदा घाला. कांदा ब्राउन होत आला की मश्रुम्स घाला. दहा ते पंधरा मिनिटे मश्रुम्स ब्राऊन रंगावर परता. मश्रुम्स शिजत आले की मीठ आणि मिरपूड घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळे एकत्र करून २ मिनिटे परता.
गरमागरम मश्रुम्स प्लेटमध्ये काढून त्यावर गार्लिक सॉस घाला. आवडीच्या ब्रेड सोबत सर्व्ह करा.
आवडत असल्यास वाफाळती ग्लुवाईन घ्या आणि खायला सुरुवात करा.
Guten Appetit!
