शाकाहारी पाककृती

हुरड्याचे थालीपीठ

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

हुरड्याचे थालीपीठ

Postby archana » Sat Feb 07, 2015 2:55 pm

साहित्य:

२ वाट्या हुरडा , घरात असलेली भाजणी एक दीड वाटी,कोथिम्बिर ,मीठ, आवडीप्रमाणे ,चीलीफ्लेक्स एक चमचा ,लसुन मिरची ची भरड एक चमचा .तेल ,पाणी.



कृती:

सर्व प्रथम हुरडा ,कोथिम्बिर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे .(पाणी न घालता)ताटात काढून त्यात सगळे पदार्थ आणि भाजणी टाकून साधारण थालीपीठ साठी भिजवतो तसे भिजवून घ्यावे .अर्धातास झाकून ठेवून द्यावे .
नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून ,दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे .
दही आणि लोणच्याबरोबर गरमागरम खावे .

archana
A Cook In The Making
 
Posts: 5
Joined: Thu Apr 10, 2014 1:41 pm
Name: archana

Re: हुरड्याचे थालीपीठ

Postby manish » Mon Feb 09, 2015 10:39 am

अहाहा....मस्त ताज्या हुरड्याची थालीपीठ चविष्टच असणार. ह्या अनोख्या पाककृतीबद्दल मनापासून धन्यवाद! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 5 guests