शाकाहारी पाककृती

बिशी बेले भात

सर्व शाकाहारी, व्हेगन पाककृती

बिशी बेले भात

Postby archana » Sat Feb 07, 2015 2:45 pm

साहित्य:

१ वाटी तांदूळ, १ वाटी तुरडाळ ,वांगे १ ,टोमाटो १,कांदा १,फरसबी ,गाजर,वाटाणा,लाल भोपळा आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता .तेल ५-६ चमचे ,मीठ चवीनुसार ,चिंचेचा कोळ १ चमचा ,शेंगदाणे आवडीप्रमाणे ,४-५ कढीपत्त्याचे पाने, कोथिंबीर,सुक्या लाल मिरच्या २,पाणी आणि सर्वात महत्वाचे एम .टी.आर चा बिशी बेले मसाला ३ चमचे.



कृती:

१) सर्व प्रथम डाळ तांदूळ वेगवेगळे धुवून ते नेहमीप्रमाणे डाळ भाताचा जसा कुकर लावतो तसा लावून घ्यावा .४-५ शिट्या होऊ द्याव्यात .
२)एकीकडे भाज्या धुवून त्यातील गाजर ,लाल भोपळा ,वांगे ,बटाटा चौकोनी आकारात कापून घ्या .टोमाटो बारीक चिरून घ्या .कांदा उभा चिरून घ्या .फरसबी चे एक इंचाचे तुकडे करावेत .
३)एका भांड्यात ३ चमचे तेल घालून ते तापले कि कांदा टोमाटो टाकून परता.



४)मग त्यात चिरलेल्या भाज्या टाका आणि वर झाकण ठेवून त्यात पाणी टाकून टाकून वाफेवर शिजू द्या .१० मी .भाज्या शिजतील .पूर्ण गाळ होता कामा नये .अक्ख्या फोडी दिसल्या पाहिजेत अशा बेताने शिजवावे ,आणि त्यात ३ चमचे बिशी बेले मसाला टाकावा


५) एकीकडे कुकर गार झाला असेन तर शिजलेली डाळ जरा घोटून घ्यावी.
६) डाळ भाज्या शिजत असलेल्या भाड्यात टाकावी ,नीट मिक्स करावे .त्यात शिजवलेला भात मोकळा करून टाकावा




७)त्यात चिंचेचा कोळ ,मीठ टाकून नीट एकजीव करावे .अर्धा पेला पाणी घालून ५-७ मी. शिजू द्यावे


तयार भात असा दिसेल .

८)एकीकडे एका छोट्या भांड्यात फोडणीसाठी २ चमचे तेल तापवावे .त्यात कढीपत्ता पाने ,लाल सुक्या मिरच्या आणि शेंगदाणे यांची खरपूस फोडणी करावी आणि त्या तयार झालेल्या भातावर टाकावी,कोथिम्बिर टाकावी .


बिशी बेले भात तयार .
archana
A Cook In The Making
 
Posts: 5
Joined: Thu Apr 10, 2014 1:41 pm
Name: archana

Re: बिशी बेले भात

Postby manish » Mon Feb 09, 2015 10:50 am

मस्त! हे मातीचे भांडे आहे ना? वेगळाच खुमार येत असेल त्याने..माझी आई ह्याला तुपाची फोडणी देते, मस्त चव येते!
बा़की ही तपशीलवार, चित्रांसह पाककृती खासंच आहे - नुसती बघुनच तोंडाला पाणी सुटतेय! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: बिशी बेले भात

Postby archana » Thu Feb 12, 2015 6:13 pm

धन्यवाद मनीष जी ! हो हे मातीचे भांडे आहे .यात बनवलेला कुठलाही पदार्थ अगदी खमंग आणि खूप चविष्ट होतो .त्यामुळे काही ठराविक पदार्थ बनवायला मी मातीचे भांडेच वापरते .
archana
A Cook In The Making
 
Posts: 5
Joined: Thu Apr 10, 2014 1:41 pm
Name: archana


Return to शाकाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 5 guests