१ वाटी तांदळाचा शिजवलेला भात (शिळा भात असल्यास तो ही चालेल)
१ वाटी खवलेला ओला नारळ (प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्तं घ्यावे)
१/२ टीस्पून मोहरी
१ टीस्पून उडदाची डाळ
१ टीस्पून चणाडाळ
१ टेस्पून काजू
२-३ लाल सुक्या मिरच्या तोडून
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
कढीपत्ता
१/४ टीस्पून हिंग
मीठ चवीनुसार
पाकृ:
पातेल्यात २ टेस्पून खोबरेल तेल गरम करावे. तुम्ही रोजच्या वापरातले तेल वापरले तरी चालेल पण खोबरेल तेल वापरल्यामुळे भाताचा स्वाद छान लागतो.
त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करावी.
त्यात उडदाची डाळ, चणाडाळ व काजू घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे.
त्यात कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या व हिरवी मिरची घालून परतावे.
आता त्यात ओला नारळ व मीठ घालून खोबर्याचा रंग न बदलता मंद आचेवर परतावे.
शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करावे व झाकून मंद आचेवर एक-दोन वाफा काढाव्यात.

दिसायला साधा तरीही फ्लेव्हरफूल असा हा कोकोनट राईस तुम्ही पापड, लोणचं, रस्सम किंवा सांबाराबरोबर सर्व्ह करु शकता.
नोटः
हा भात खोबर्यामुळे पांढराच ठेवावा, कृपया हळद घालू नका.
आवडत असल्यास ह्यात शेंगदाणे ही घालू शकता.
झटपट होतो त्यामुळे मुलांच्या डब्याला ही देता येईल.