१२-१५ छोटे बटाटे (बेबी पटेटोज)उकडून, सालं काढून घेणे
१ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून हळद
दीड टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपुड
१ टीस्पून जीरेपूड
मीठ चवीनुसार
१ टेस्पून लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावे.
पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्याची फोडणी करावी.
त्यात उकडलेले बटाटे, मीठ व सुके मसाले घालून परतून घ्यावे.
झाकून एक वाफ काढावी.
त्यात शेवटी लिंबाचा रस व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.
![](https://lh5.googleusercontent.com/-xFbqtqDkh4s/U-zYtxx39MI/AAAAAAAAN_4/YVS2tYeRS80/w271-h542-no/Desktop18.jpg)
साहित्य स्टफ्ड कांदा पूरी:
नेहमीप्रमाणे पुर्यांसाठी कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यावी.
१ छोटा कांदा बारीक चोचवून/ चिरून घ्यावा.
१/२ टीस्पून हळद
दीड टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
एका भांड्यात कांदा, हिरवी मिरची, कोथींबीर, हळद, लाल तिखट, धणेपूड, मीठ व चिरलेली कोथींबीर एकत्र करावे.
कणकेची छोटी पारी लाटून त्यावर एक चमचा कांद्याचे सारण घालावे.
सर्व बाजूंनी नीट बंद करुन, दाबून हलक्या हाताने जाडसर पूरी लाटावी.
तेल गरम करायला ठेवावे.
तेलात पूरी सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावी.
चिरलेला कांदा असल्यामुळे पुर्या जास्तं फुगत नाही.
![](https://lh6.googleusercontent.com/-12SZX-hVbBQ/U-zZEz-R6fI/AAAAAAAAOAI/GIZG1pLRU4w/w600-h450-no/Desktop19.jpg)
गरमचं सर्व्ह कराव्यात.
तुम्ही ह्या पुर्या चहा, चटणी, सॉससोबत सर्व्ह करु शकता, मी जीरा-आलूसोबत सर्व्ह केल्या आहेत.
नोटः
वरील प्रमाणेच कणकेऐवजी मैदा भिजवून त्यात हे सारण भरावे व मंद आचेवर तळावे.
खुसखुशीत कांद्याची कचोरी तयार, पण फार टिकत नाही लगेच संपवाव्या लागतात.
थोड्या हेवी असतात म्हणून नाश्त्याला सर्व्ह करता येतात.