
साहित्य-
२ वाट्या शेवया,
१ लहान कांदा,१ लहान टोमॅटो,
२ हिरव्या मिरच्या, ४-५ कढिलिंबाची पाने,
१ मूठभर शेंगदाणे,
मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर,
फोडणीचे साहित्य, एक पळी तेल
ओले खोबरे, कोथिंबिर,
२ वाट्या गरम पाणी
कृती-
शेवया कोरड्याच तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा.
जर भाजलेल्या शेवया असतील तर किंचित भाजून घ्या.
फोडणी करून त्यात कांदा,टोमॅटो,शेंगदाणे घाला व परता. झाकण ठेवून शिजू द्या.
भाजलेल्या शेवया घाला. मीठ व साखर घाला आणि सगळे एकत्र करून परता.
त्यात आधण पाणी ओतून ढवळा व चांगली वाफ येऊ द्या.
ओले खोबरे व कोथिंबिर घाला.
आमच्याकडे उपमा म्हणजे जिरं मोहरी उडदाची डाळ वाली फोडणी.. (पांढरा)
शिरा म्हणजे गोडाचा शिरा
किवा तिखटमीठाचा शिरा- हळद,हिंग अशी नेहमीची फोडणी (पिवळा)