
साहित्य-
५-६ उकडलेले बटाटे,३-४ स्लाइस ब्रेड,
साधारण २.५ ते ३ वाट्या मटारदाणे,
साधारण पेरभर आलं ,२-३ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या ,
मीठ, तेल, रवा किवा ब्रेडक्रम्स
कृती-
आलं मिरच्या लसणीची पेस्ट करुन घ्यावी.
बटाटे उकडून सोलून घ्यावेत, नंतर ते कुस्करावेत.त्यात चवीनुसार मीठ,चमचाभर आलं मिरची लसणीची पेस्ट घालावी.ब्रेडचे स्लाइस पाण्यातून काढून नंतर दाबून पाणी काढून ते बटाट्यात मिसळावेत.मळून गोळा करुन घ्यावा.
चमचाभर तेलावर मटार वाफवून घ्यावेत, त्यात १.५ ते २ चमचे आलं मिरची लसणीचे वाटण घालावे, चवीनुसार मीठ घालावे व चांगली वाफ काढावी.
बटाट्याच्या गोळ्यातून लिंबाएवढा गोळा घेऊन खोलगट आकाराची पारी करावी.त्यात मटारचे सारण घालावे. पारी बंद करावी,चपटी करुन रवा किवा ब्रेडक्रम मध्ये घोळवावी. असे सर्व पॅटिस करावेत.(बटाट्याचा गोळा किवा मटारचे सारण यातले एक काहीतरी उरलंच तर ते भाजीत घालता येते.)
तव्यावर तेल सोडावे व पॅटिस लावावेत. वरुनही तेल सोडावे.पॅटिस शॅलोफ्राय करावेत.
टोमॅटो केचप, चिंचगुळाची चटणी ह्यापैकी हवे त्या बरोबर गरम गरम सर्व्ह करावे. ह्या साहित्यात १६/१७ पॅटिस होतील.