साहित्यः
२ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात असेल तरी चालेल)
१ वाटी कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्तं घ्यावे)
२ हिरव्या मिरच्या चिरून
कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून चणाडाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
१ टेस्पून काजू (तुम्ही शेंगदाणे ही वापरु शकता)
मीठ चवीनुसार
खोबरेल तेल (रोजचे वापरातले तेल घेतले तरी चालेल)
पाकृ:
भांड्यात खोबरेल तेल गरम करून मोहरी. मेथ्या, डाळी व हिंगाची फोडणी करावी.
डाळी लालसर परतल्या गेल्या की त्यात हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता व काजू घालून परतून घ्यावे.
आता त्यात हळद घालून वरून शिजवलेला भात घालावा व मिक्स करावे.
आता त्यात कैरीचा कीस, मीठ घालून हलके मिक्स करुन घ्यावे.
झाकण ठेवून एक वाफ काढावी.

हा भात तुम्ही लोणचं, पापड किंवा रस्समसोबत सर्व्ह करु शकता.
आधी करुन ठेवला तर कैरीचा स्वाद छान मुरेल.