शाकाहारी पाककृती
रगडा पॅटिस
2 posts
• Page 1 of 1
रगडा पॅटिस
साहित्य रगड्यासाठी:
१ मोठी वाटी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून ६-७ तास भिजवून ठेवणे
१/४ टीस्पून हिंग
१/२ टेस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून काळा मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून चिंचेचा कोळ
पाकृ:
पांढरे वाटाणे हिंग व हळद घालून कुकरला मऊसर शिजवून घ्या.
पातेल्यात तेल गरम करुन त्यात शिजवलेले वाटाणे, लाल तिखट, काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळा व थोडेच पाणी घालून उकळी आणा.
रगडा नीट शिजला की गॅस बंद करा.
(आवडत असल्यास फोडणीत चमचाभर आले+लसूण पेस्ट परता)
साहित्य पॅटिससाठी:
४-५ बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या म्हणजे पॅटिस करताना गुठळ्या राहणार नाही.
२ टेस्पून आले+ लसूण+ हिरवी मिरची वाटून (तुम्ही पेस्ट वापरु शकता, मला भरडसर वाटलेले आवडते म्हणून तसे घेतले आहे)
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीनुसार
मैदा बाईंडिंगसाठी
पाकृ:
बटाट्याच्या मिश्रणात वाटलेले आले+ लसूण+ हिरवी मिरची, हळद, चाट मसाला, मीठ व मैदा घालून चांगले मिक्स करावे.
मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन चपटे करुन पॅटिस तयार करावे.
नॉन-स्टिक तव्यावर तेल घालून पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे.
साहित्य सर्व्हिंगसाठी:
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
चाट मसाला
चिंच-खजुराची चटणी
( १ वाटी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा, गरम पाण्यात १/२ वाटी खजूर भिजवून, वाटून घेणे. चिंचेचा कोळ उकळायला ठेवावा, उकळी आली की त्यात गुळ , वाटलेला खजूर, लाल-तिखट, सुंठपूड, जीरे पावडर व मीठ किंवा सैंधव घालावे.)
पुदिन्याची चटणी
( मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ, जीरे व साखर एकत्र वाटून चटणी बनवणे.)
वरुन घालायला शेव/ फरसाण (इथे शेव सहज मिळत नसल्यामुळे मी फरसाण वापरले आहे तुम्ही भरपुर शेव घालून सर्व्ह करु शकता )
सर्व्हिंगः
एका प्लेटमध्ये रगडा घालून घ्या त्यावर तयार पॅटिस ठेवावे.
आता त्यावर पुदिन्याची चटणी व चिंच-खजुराची चटणी घालावी.
वरुन चिरलेला कांदा व कोथींबीर घालावी.
वरुन शेव/ फरसाणने गार्निश करुन सर्व्ह करावे.
रगडा पॅटिस खाण्यासाठी तयार आहे
- Sanika
- Distinguished Chef
- Posts: 38
- Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
- Name: Sanika Nalawde
Re: रगडा पॅटिस
तपशीलवार, देखणी रेसिपी आणि ही खात्रीने चविष्ट असणार...आणि तुझ्या प्रेझेंटेशनबद्द्ल अजून नवीन काय बोलणार? अतिशय सुरेख!! बघुनच तोंडाला पाणी सुटतेय....मनापासून धन्यवाद!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
2 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 7 guests